पुणे : उजनी जलाशयावर ‘गॉडविट’ आले; पण उशिराने | पुढारी

पुणे : उजनी जलाशयावर ‘गॉडविट’ आले; पण उशिराने

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा

सामान्यपणे आठ ते दहा दिवसांत सलग अकरा हजार किलोमीटर प्रवास करून भारतीय उपखंडात दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित होणारे पाणटिवळा (गॉडविट) हे विदेशी पक्षी या वर्षी दोन महिने उशिराने उजनी जलाशयावर दाखल झाले आहेत.

१२ आमदारांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा; शरद पवारांचे स्पष्टीकरण

सध्या उजनी जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने हे पक्षी येथे मोठ्या संख्येने वावरताना दिसत आहेत. पाणटिवळा या नावाने परिचित असलेले हे जलचर पक्षी उत्तर युरोप, आलास्का व पॉलिआर्टिक तसेच सैबेरिया या ठिकाणी मूळ वास्तव्याला असतात. दरवर्षी हे विदेशी पक्षी थंडीची सुरुवात झाल्यावर काही न्यूझीलंडकडे, तर काही भारतीय उपखंडात स्थलांतरित होतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये हे पक्षी आल्यानंतर उन्हाळ्यात शेवटच्या क्षणापर्यंत दलदली व सरोवरे गाठून तळ ठोकून राहतात.

भारताचा जीडीपी दर साडेसात टक्के राहणार, आशियाई विकास बँकेचा अंदाज

टिटवी एवढा आकार

आकाराने टिटवी एवढा असलेला हा पक्षी बदामी रंगाचा आहे. या पक्ष्यांच्या पंखांवर चित्रविचित्र रंगांचे ठिपके असतात. जलचर असलेल्या पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण असून ती बारीक, सरळ व किंचित वरच्या बाजूला वाकलेली असते व तिचा उपयोग चिखलात खोलपर्यंत बुडवून जलकीटकांना टिपण्यासाठी होतो. मृदुकाय प्राणी व खेकडे यांच्यावरही हे पक्षी उदरनिर्वाह चालवतात. हे पक्षी एकट्याने किंवा मोठ्या थव्याने आढळून येतात.

इंधन दरात १६ दिवसांत १० रुपयांची वाढ : मुंबईत पेट्रोल दराने ओलांडला १२० रुपयांचा स्तर

भारतात आल्यानंतर हे पक्षी नदीकाठचे किनारे, दलदलीची क्षेत्रे व अनेकदा भातशेतात आपले बिर्‍हाड टाकतात. या पक्ष्यांची वैशिष्ट्ये म्हणजे ते तब्बल आठ ते दहा दिवस न थांबता न खाता-पिता उडतात. या मॅराथॉन उड्डाणात हे पक्षी अन्य पक्ष्यांच्या तुलनेत खूपच कमी ऊर्जा खर्च करतात. सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात हे पक्षी ठरावीक गट तयार करून सामूहिक उड्डाण घेत आपल्या मूळ स्थानी परतीच्या प्रवासाला निघतात.

Alcohol and Human : लोकं दारू का पितात? गुंगीत राहणार्‍या माकडाच्‍या प्रजीतीवर होणार संशोधन

या वर्षी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे हे पक्षी महिनाभर उशिरा येऊन दाखल झाले आहेत. विमानाचे आतापर्यंतचे दीर्घ उड्डाण साडेतीन दिवसांचे असल्याची नोंद आहे. या पाणटिवळे पक्ष्यांच्या सलग आठ ते दहा दिवस उड्डाणाचा विचार केला तर पक्षिजगतातील ही एक विस्मयकारक घटना म्हणून गणना करता येईल.

                                                  – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी, पर्यावरण निरीक्षक

Back to top button