वैद्यकीय अभ्यासक्रमांची मॉप-अप फेरी अखेर रद्द | पुढारी

वैद्यकीय अभ्यासक्रमांची मॉप-अप फेरी अखेर रद्द

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दोन मुख्य फेर्‍या झाल्यानंतर आयोजित केलेली मॉप-अप फेरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. यामुळे दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे.

भारताचा जीडीपी दर साडेसात टक्के राहणार, आशियाई विकास बँकेचा अंदाज

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (एमडी/एमएस व पदविका) सुरू असलेल्या प्रवेशात 28 जानेवारीला पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये 1 हजार 865 जागा होत्या. त्यापैकी दुसर्‍या फेरीत प्रवेश पूर्ण होऊन 414 जागा राहिल्या होत्या. या फेरीतील रिक्त जागांवर प्रवेश पूर्ण करण्यासाठी मॉप-अप फेरी 26 मार्च रोजी जाहीर केली होती. मात्र, या फेरीला विद्यार्थ्यांनी आव्हान दिल्याने आता पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या दोन मुख्य फेर्‍या झाल्यानंतर आयोजित केलेली मॉप-अप फेरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. यामुळे दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता सीबीआयच्या ताब्यात

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या फेरीनंतर आता 1 मॉप-अप फेरी झाली. त्यानंतर मॉप-अप फेरी ही केवळ शासकीय महाविद्यालयासाठी घेण्यात आली आहे. या फेरीची शेवटची तारीख 4 एप्रिल होती. खासगी महाविद्यालयात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी महाविद्यालयास हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमासाठी दोन फेर्‍या पूर्ण झाल्या असून, ऑल इंडिया मॉप-अप फेरी झाल्यानंतर राज्यातील कोटा भरण्यासाठी फेरी होईल. यासाठी 8 एप्रिलपर्यंत एक फेरी होईल, असेही सीईटी सेलच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा

Karnataka hijab row : कर्नाटकातील हिजाब वादात अल-कायदाची एंट्री! अल- जवाहिरीनं जारी केला ९ मिनिटांचा व्हिडिओ

इंधन दरात १६ दिवसांत १० रुपयांची वाढ : मुंबईत पेट्रोल दराने ओलांडला १२० रुपयांचा स्तर

संजय राऊत संतप्त, किरीट सोमय्यांना केली अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

Back to top button