पुणे : आंबेगाव तालुक्यातील शिंगव्यात आढळली ‘लेपर्ड गेको’ दुर्मिळ पाल | पुढारी

पुणे : आंबेगाव तालुक्यातील शिंगव्यात आढळली 'लेपर्ड गेको' दुर्मिळ पाल

पारगाव : पुढारी वृत्तसेवा

शिंगवे (ता. आंबेगाव) येथील तोरण्या डोंगराच्या माळरानावर ”लेपर्ड गेको” ही दुर्मिळ जातीची पाल आढळून आली आहे. सर्प व कीटक अभ्यासक गायत्री राजगुरव यांना अभ्यास करताना ही पाल आढळली. ही दुर्मिळ जातीची पाल असल्याचे गायत्री यांनी सांगितले.

शिंगवे येथील सर्प व कीटक आभ्यासक गायत्री राजगुरव व शारदा राजगुरव या शिंगवे परिसरातील तोरण्या डोंगर परिसरात जैवविविधतेचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांना डोंगरातील माळरानावर “लेपर्ड गेको” या दुर्मिळ पालीचे प्रथमच अस्तित्व आढळून आले.

उत्तराखंड : भाजपा- काॅंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार धामी-रावत या दोघांचाही पराभव  

मादी पाल नरापेक्षा लहान

“लेपर्ड गेको”ची मादी ही नरापेक्षा आकाराने लहान असून, नराची लांबी २० ते २८ सेंटिमीटर असते, तर मादी १८ ते २० सेंटिमीटर लांबीची असते. या पालीच्या पिलांच्या अंगावर गडद पिवळे व काळे आडवे पट्टे दिसतात. पालीच्या वाढीबरोबर अंगावरील पट्टे फिकट होऊन बिबट्यासारखी ठिपक्यांची नक्षी पालीच्या अंगावर दिसून येते.

उत्तर प्रदेशात भाजप जिंकूनही फक्त सपा आणि अखिलेश यादवांसाठी गुड न्यूज !

”लेपर्ड गेको ” ही खडकाळ माळरानावर आढळणारी पालीची निशाचर प्रजाती आहे. ती फक्त रात्रीच्या वेळीच ढगाळ वातावरण व पहिल्या पावसात माळरानातील खडकांवर, दगडांवर आढळते. या पालीचे शास्त्रीय नाव “युब्लिफॅरिस मॅक्युलारिस” आहे. अंगावर असणाऱ्या बिबट्यासारख्या नक्षीमुळे तिला “लेपर्ड गेको” असे म्हटले जाते. शेतीला उपद्रवी लहान कीटक, नाकतोडे, पतंग हे या पालीचे भक्ष्य असून, या उपद्रवी कीटकांच्या नियंत्रणाचे काम या पालीकडून होते.

                                                                     – गायत्री राजगुरव, कीटक अभ्यासक

हेही वाचा

Aap in Panjab : पंजाबात ‘आप’च्या विजयानंतर व्हायरल होतोय शाखरुख खानचा व्हिडिओ

punjab election 2022 : माजी मुख्‍यमंत्री चरणजीत चन्‍नी, अमरिंदर सिंग पराभूत

Navjot Singh Sidhu : नवज्‍योत सिंग सिद्धू यांची राजकीय कारर्कीद धोक्‍यात?

Back to top button