उत्तर प्रदेशात भाजप जिंकूनही फक्त सपा आणि अखिलेश यादवांसाठी गुड न्यूज ! | पुढारी

उत्तर प्रदेशात भाजप जिंकूनही फक्त सपा आणि अखिलेश यादवांसाठी गुड न्यूज !

लखनऊ ; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. बुलडोझरला शस्त्र बनवून प्रचारात उतरलेल्या योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यांच्या आशेची इमारत उद्ध्वस्त केली आहे. दुपारी 3.15 पर्यंत भाजप 261 जागांवर तर सपा 135 जागांवर आघाडीवर होती.

समाजवादी पक्षाला सरकार स्थापनेचा दावा पूर्ण करता आला नसला, तरी अखिलेश यादव यांनी पक्षाची कामगिरी निश्चितच सुधारली आहे. सपाच्या जागा जवळपास तिपटीने वाढल्या आहेत. याशिवाय पक्षाच्या मतदार संख्येतही १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

जागा वाढवणारा एकमेव पक्ष… 

यूपीचा पराभव होऊनही, सपाच्या बाजूने असे काही आकडे आहेत ज्यावरून पक्षाला समाधान वाटू शकते. सपा हा एकमेव पक्ष आहे ज्याच्या जागा वाढल्या आहेत. भाजपला बहुमत मिळाले असेल, पण जागांच्या बाबतीत मात्र त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला 325 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भगवी आघाडी 260 जागांच्या आसपास राहू शकते.

बसपा आणि काँग्रेसच्या जागाही कमी झाल्या… 

मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपालाही या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मायावतींना 19 जागा मिळाल्या होत्या, यावेळी पक्ष सिंगल डिजिटमध्ये आला आहे. सध्या फक्त 2 जागांवर आघाडीवर आहे. सपासोबत आघाडी करून 7 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्याही 3 जागांपर्यंत राहिल्‍याचे दिसून येत आहे.

Back to top button