पुढारी ऑनलाईन डेस्क
पंजाब विधानसभा निवडणूक निकाला आता स्पष्ट होत आहेत. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी भगवंत मान हे ४५ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे दाेन्ही मतदारसंघातून पराभूत झाले आहे.माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे १३ हजारांनी तर अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल हे १२ हजार मतांनी पराभूत झाले आहेत.आम आदम पार्टीने दिल्ली पाठोपाठ पंजाबचा गड जिंकला आहे. ( punjab election 2022 )
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी भदौड आणि चमकौर साहिब या दाेन मतदारसंघांतून निवडणूक लढवली हाेती. मात्र या दाेन्ही मतदारसंघांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. अमृतसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू, मोहालीमध्ये बलबीर सिंग सिद्धू, जालालाबदमध्ये सुखबीर बादल हे पराभूत झाले आहे.
पंजाबमध्ये मागील निवडणुकीपेक्षा ७१.९५ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत ते ५ टक्क्यांनी कमी आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता. या राज्यात सर्वाधिक वेळा काँग्रेसचे आले आहेत. मागील निवडणुकीत म्हणजे २०१७मध्ये काँग्रेसने ६६ टक्के मते घेतली होती. तर १९९२ मध्ये ७४ टक्के मते आपल्या नावावर केली होती. राज्यात आतापर्यंत २२ मुख्यमंत्री झाले. त्यातील १४ मुख्यमंत्री हे काँग्रेसचे होते.
देशातील सर्वाधिक अनुसूचित जातीची ( ३१.९ टक्के ) लोकसंख्या पंजाबमध्ये आहे. यातील सर्वाधिक जाट शीख ही संख्या २० टक्क्यांहून अधिक आहे. पंजाब राज्यातील दक्षिणेकडील ६९ मतदारसंघात राज्यातील राजकीय नेत्याचे भवितव्य ठरते, असे राजकीय विश्लेषक मानतात.
हेही वाचलं का?