Russia vs Ukraine : रशियाचे लष्करी टॅंक युक्रेनच्या दिशेने रवाना | पुढारी

Russia vs Ukraine : रशियाचे लष्करी टॅंक युक्रेनच्या दिशेने रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे लष्करी टॅंक युक्रेनच्या दिशेने सरकत आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या लष्करावा युक्रेनवर हल्ला करण्याचे प्रत्यक्ष आदेश दिलेले आहेत. हल्ल्याच्या शेवटच्या योजनेवर सध्या काम सुरू आहे, असा दावा अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याने केला आहे.  (Russia vs Ukraine)

रशिया क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यांपूर्वी सायबर हल्ल्यांची सुरूवात करणार आहे. शेवटी जमिनीच्या लष्करी तुकड्या युक्रेनच्यावर नियंत्रण मिळविणार आहेत. रशियाच्या आघाडीवर लष्करी सेनेची वाहने, टॅंकवर ‘झेड’ हे संकेतात्मक अक्षर पेंटने लिहिलेले आहेत. हे टॅंक युक्रेनच्या सीमेच्या दिशेने सरकत असल्याचे दिसत आहेत.

Russia Vs Ukraine www.pudhari.news

झेड हे अक्षर युद्धाच्या दरम्यान मित्र आणि शत्रू यांची ओळख होण्यासाठी तयार करण्यात येतात. युक्रेनी विश्लेषकांनी हा दावा केला आहे की, युक्रेनजवळही रशियासारखे टॅंक आणि वाहने आहेत. त्यामुळे आपल्याच लष्कराकडून होणाऱ्या हल्ल्यातून वाचण्यासाठी हे निशाण तयार करण्यात आलं आहे. वाहनांवर अशी अक्षरं लिहिण्याची सुरूवात खाडीच्या युद्धादरम्यान अमेरिकेने आणि ब्रिटिश सेनेनी केलेली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लष्करी वाहनांवर उटला व्ही निशाण तयार केलं होतं. (Russia vs Ukraine)

अमेरिकेची उपराष्ट्रपती कमला हॅरिस म्हणाल्या की, “युरोपमधील युद्धाची शक्यता वास्तव आहे. रशियाकडून सातत्याने केलेल्या अतिक्रमणामुळे अमेरिका रशियावर मोठे प्रतिबंध लावणार आहे.” अमेरिकेतील रशियाचा राजदूत एनातोली एंतोनोव म्हणाले की, “रशियाची कोणत्याही देशाच्या जमिनीवर नियंत्रण मिळविण्याची योजना नाही. रशिया डोनबास क्षेत्राला युक्रेनच्या हिस्‍सा असल्‍याचे मानते.  मी हे सांगू इच्छितो की, डोनबास आणि लुहांस्क हे युक्रेनचे हिस्से आहे, त्यावरून हा वाद सुरू आहे.”

पाहा व्हिडीओ :

हेही वाचलंत का

Back to top button