डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार सरकारसाठी प्रेरणादायी : पंतप्रधान | पुढारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार सरकारसाठी प्रेरणादायी : पंतप्रधान

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित आणि वंचितांच्या उध्दारासाठी दिलेले विचार हे सरकारसाठीदेखील प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) केले. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

देशाच्या विकासात बाबासाहेबांनी दिलेले योगदान नाकारले जाऊ शकत नाही, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदींनी संसद भवनाच्या प्रांगणात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली.

तळागाळातील गरिबांचे हित लक्षात घेऊन आपले सरकार योजना हाती घेते. सामाजिक न्यायाच्या अनेक योजनांत रालोआ सरकारने नवीन मापदंड निर्माण केलेला आहे. यामागे बाबासाहेबांचे विचार निश्चितपणे आहेत, असे मोदी यांनी सांगितले. दरम्यान, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button