एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ! 7 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी

एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर ! 7 जुलैपर्यंत करता येणार नोंदणी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या मुदतीनंतर नोंदणी आणि पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. पसंतीक्रम भरणे व पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत प्रसिध्द केले जाणार असल्याचे सेलकडून स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जांची निश्चिती करण्याची प्रक्रिया 8 जुलैला संपेल. सात जुलैनंतर नोंदणी व पडताळणी झालेल्या अर्जांचा विचार 'नॉन कॅप' जागांसाठी केला जाणार आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना www.mba2023.mahacet.org.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news