Madhuri : ‘हुस्न ए परी’ माधुरीच्या एका स्मितहास्यानं लावलं वेड (Photos)

madhuri dixit
madhuri dixit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

लाखो चाहत्यांची धडकन असलेल्या माधुरी दीक्षितने वर्षानुवर्षे आपल्या हास्याची जादू लोकांवर चालवली आहे. तिचं एक स्मितहास्यदेखील वेड लावून जातं. तिचा अभिनय, तिचं हास्य, तिची अदा सर्वच कसं परफेक्ट आहे. आता तिने दोन फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हसताना दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टा पेजला हे फोटोज शेअर केले आहेत. यासोबतचं तिने खूप सुंदर कॅप्शन दिलीय.

तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय- Dil ne kaha dekhe jo jalwe husn yaar ke, Laya hai kaun unko falak se utar ke ❤️
#WednesdayVibe #Mood #Snooker

शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसते. तिचं मोहून टाकणारं हास्य वेड लावणारं आहे. तिने विंग्ज गोल्डन कलर ड्रेस परिधान केला असून ती स्नूकर खेळताना दिसतेय.

तिचा मोठा फॅन असलेला अभिनेता आणि अँकर अर्जुन बिजलानीने तिच्या या पोस्टला हार्ट इमोजी ❤️ शेअर केलीय. काही नेटकऱ्यांनी तिला सौंदर्याची राणी म्हटलंय. My god my Queen ???, Beautiful ❤️❤️??, You are very gorgeous and glamorous in that outfit, Madhuri Dixit Ji! ??????????, Aap kbhi Old nhi hoge madhuri jiii ???. अशाही कमेंट्स माधुरीला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

माधुरीचा हा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या नव्या लूकमध्ये माधुरीचं हसू फुलपाखरासारखं फुलताना दिसत आहे. माधुरीचे सौंदर्य अजिबात कमी झाले नाही.

माधुरी दीक्षित सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी मजेदार आणि उत्तम व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओंमध्ये कधी ती तिच्या को-स्टारसोबत डान्स करताना दिसत आहे, तर कधी ती तिच्या मेमरी बॉक्समधून काही छान फोटो शेअर करताना दिसते. इन्स्टाग्रामवर तिचे ३० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

माधुरी दीक्षितने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. बेटा, तेजाब, देवदास, दिल तो पागल है यांसारख्या शानदार चित्रपटांतून तिने आपले अभिनयाचे कौशल्य सिद्ध केले आहे. नुकतीच माधुरी दीक्षित द फेम गेममध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news