LSG vs KKR : लखनौचे केकेआरसमोर १७७ धावांचे आव्हान

LSG vs KKR
LSG vs KKR
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ चे प्लेऑफचे सत्र लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डनवर लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यादरम्यान या हंगामातील ६८ वा सामना खेळवला जात आहे. दरम्यान केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनौने निकोलस पूरनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांअखेर ८ विकेट गमावत १७६ धावा केल्या. केकेआरसमोर १७७ धावाचे आव्हान ठेवले आहे.

लखनौकडून क्विंटन डिकॉक २७ चेंडूमध्ये २८, प्रेरक मांकडने २० चेंडूमध्ये २६, आयुष बदोनी २१ चेंडूमध्ये २५ आणि निकोलस पूरन ३० चेंडूमध्ये ५८ धावांचे योगदान दिले. निकोलस पूरनच्या आक्रमक अर्धशतकी खेळीमुळे लखनौला १७६ धावा करता आल्या आहेत. केकआरकडून वैभव अरोरा, शार्दुल ठाकुर, सुनिल नरेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news