Noida University Killing : ब्रेकअप, कॅन्सर आणि एका लव्ह स्टोरीचा ट्रॅजिक एन्ड… नोएडा येथील धक्कादायक प्रकार | पुढारी

Noida University Killing : ब्रेकअप, कॅन्सर आणि एका लव्ह स्टोरीचा ट्रॅजिक एन्ड... नोएडा येथील धक्कादायक प्रकार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ग्रेटर नोएडामध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना ग्रेटर नोएडातील दादरी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या शिव नादर विद्यापीठात घडली. येथील शिव नादर विद्यापीठात एका विद्यार्थ्याने आधी त्याच्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवले. या घटनेमुळे दादरी पोलीसठाणे परिसरात एकच खळबळ उडाली. (Noida University Killing)

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी कानपूरचा तर विद्यार्थीनी अमरोहा येथील रहिवासी होती. ही संपूर्ण घटना गुरुवारी (18 मे) दुपारची आहे. येथे एका विद्यार्थ्याने त्याच्या मैत्रिणीवर ३ गोळ्या झाडल्या, त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विद्यार्थ्यानेही स्वत:वर गोळी झाडून जीव दिला. (Noida University Killing)

दुसरीकडे, या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी (18 मे) दादरी पोलीस ठाणे परिसरात शिव नादर विद्यापीठातील बीए समाजशास्त्राच्या तृतीय वर्षात अनुज आणि तिची मैत्रीण स्नेहा शिकत होते. गुरुवारी महाविद्यालायच्या डायनिंग हॉलसमोर काही वेळ बोलत उभारले. काहीवेळाने त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्यानंतर अनुजने स्वत:कडील पिस्तुलीने स्नेहावर तीन गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी पुढे सांगितले की, स्नेहावर गोळी झाडल्यानंतर अनुज हा हॉस्टेलमध्ये गेला आणि त्याने रुम नं ३२८ मध्ये स्वत:वर गोळी झाडून घेऊन जीव दिला. स्नेहावर गोळ्या झाडल्यानंतर तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, तोपर्यंत स्नेहाचा मृत्यू झाला होता. (Noida University Killing)

अनुजने मृत्यू पूर्वी केला व्हिडिओ रेकॉर्ड

अनुजने या घटनेला सामोरे जाण्यात आधी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि यात त्याने असे कृत्य का करत आहे याचा खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये अनुजने म्हटले आहे की, त्याचे आणि स्नेहाचे प्रेम संबध होते पण, काही दिवसांपुर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. मागील काही दिवसांमध्ये त्यांच्यात फारसे चांगले बोलणे होत नव्हते. या शिवाय अनुज हा ब्रेन ट्युमरने ग्रस्त होता. त्याचा कॅन्सर तिसऱ्या स्टेजमध्ये होता. तो फारतर पुढील दोन वर्षांपर्यंत जीवंत राहू शकला असता. हे सर्व अनुजने त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा

Back to top button