IPL 2023 Playoffs : चेन्‍नईने वाढवलं मुंबई,आरसीबीचे 'टेन्‍शन'! जाणून घ्या 'प्लेऑफ'चे नवे समीकरण | पुढारी

IPL 2023 Playoffs : चेन्‍नईने वाढवलं मुंबई,आरसीबीचे 'टेन्‍शन'! जाणून घ्या 'प्लेऑफ'चे नवे समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ चा हंगाम अंतिम टप्प्यात पोहचला आहे. आता ‘प्लेऑफ’मध्ये कोणते चार संघ धडक मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरात टायटन्सने १३ पैकी ९ सामने जिंकत आपलं फ्‍लेऑफचे तिकीट पक्‍के केले आहे. आज
चेन्नई संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने १४ सामने खेळले यातील ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यामुळे १ गुण देण्यात आला होता. आजच्‍या विजयामुळे चेन्नईच्या नावावर  १७ गुण झाले आहेत. यामुळे आता आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचे टेन्‍शन चांगलेच वाढवले आहे. जाणून घेवूया आयपीएलमधील ‘प्लेऑफ’चे (IPL 2023 Playoffs) नवे समीकरण…

IPL 2023 Playoffs : मुंबई, आरसीबीवर टांगती तलवार

गुजरातनंतर आता चेन्‍नईने  प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आता उर्वरीत दाेन संघांसाठी लखनौ सुपर जायंट्स, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या तीन संघांमध्ये रस्सीखेच असणार आहे. १४ व्या सामन्यात लखनौने केकेआरचा पराभव केल्‍या तर हा संघ  प्लेऑफमधील आपलं स्‍थान पक्‍के करेल. मात्र या संघाचा पराभव झाल्‍यास याचा फायदा मुंबई आणि आरसीबीला संघाला हाेणार आहे. मात्र लखनाै जिंकल्‍यास  मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघाचे टेन्‍शन चांगलेच वाढणार आहे.  (IPL 2023 Playoffs)  आता  मुंबईचा पुढील सामना हैदराबाद विरुद्ध हाेणार आहे. तर आरसीबीला गुजरातशी सामना करावा लागणार आहे. या दाेन्‍ही संघाना आता विजयाबराेबरच धावांची गतीही ( रनरेट) चांगली ठेवावी लागणार आहे.

दिल्लीचा पराभव करत चेन्नईची ‘प्ले ऑफ’ मध्ये धडक (IPL 2023 Playoffs)

चेन्नईने ग्रुप स्टेजमधील शेवटच्या (१४ व्या) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत प्लेऑमधील आपले स्थान पक्के केले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २२३ धावापर्यंत मजल मारली. दिल्लीसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीचा संघ १४६ धावांमध्‍ये गुंडाळला गेला आणि ७७ धावांनी सामना जिंकत चेन्‍नईने दिमाखात IPL 2023 Playoffs मध्‍ये आपलं स्‍थान पक्‍के केले.

हेही वाचंलत का?

Back to top button