लोणंद -शिरवळ रोडवर अपघात ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू

लोणंद -शिरवळ रोडवर अपघात ग्रामविकास अधिकाऱ्याचा मृत्यू
Published on
Updated on

लोणंद ; पुढारी वृत्तसेवा : लोणंद -शिरवळ रोडवर मरीआईचीवाडीत अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ग्रामविकास अधिकारी श्रीकांत क्षीरसागर (रा.तरडगाव) यांचा मृत्यू झाला. दरम्यान कोणत्या वाहनाने धडक दिली याबाबत स्पष्ट झाले नसल्याने लोणंद -शिरवळ रोडवर घडलेल्या घटनेचा लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाठार बु॥ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्रीकांत क्षीरसागर हे वाठार कॉलनी कामावरून घरी जात होते. मरिआईचीवाडी गावच्या हद्दीत पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने क्षीरसागर डोक्यावर आपटुन गंभीर जखमी झाले.

डोक्याला जबरदस्त मार लागल्याने मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. यावेळी काही युवकांनी त्यांना लोणंद येथे उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले.

क्षीरसागर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अज्ञात वाहनाचा लोणंद पोलिस तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news