राहुल गांधी यांनी बंडखोरांना आरएसएसचा रस्ता सांगितला धरायला

राहुल गांधी यांनी बंडखोरांना आरएसएसचा रस्ता सांगितला धरायला
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ( दि. १६ ) पक्षातील बंडखोर नेत्यांना कडक शब्दात फटकारले. त्यांनी पक्षाच्या सोशल मीडिया टीमला मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले. पक्षाला निर्भीड लोकांची गरज आहे. त्यांना आपण पक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले.

राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया टीमशी ऑनलाईन संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी 'असे अनेक लोक आहेत जे जरासुद्धा घाबरत नाहीत आणि ते काँग्रेस पक्षाच्या बाहेर आहेत. आपण त्यांना पक्षात आणले पाहिजे.' असे मत व्यक्त केले.

अधिक वाचा :

यानंतर राहुल गांधी यांनी 'आपल्या पक्षात काही असे आहेत जे घाबरत आहेत. त्यांना बाहेर फेकून द्या. चला बाहेर जा, आरएसएसच्या बाजूने जावा. तुम्ही नकोच आहात. पक्षाला तुमची गरज नाही.' असे म्हणत बंडखोरांना कडक शब्दात फटकारले.

ते पुढे म्हणाले की, आपल्याला निर्भीड लोकांची गरज आहे. ही आपली विचारसरणी आहे. हाच माझा मूळ संदेश आहे.

भाजपवासी झालेल्या नेते रडारवर

राहुल गांधी यांनी असे वक्तव्य करत आपले आधीचे सहकारी जे पक्षाची साथ सोडून भाजपवासी झाले आहेत त्यांच्यावर निशाना साधला. त्यांचा रोख ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसाद यांच्यावर होता.

ज्योतिरादित्य शिंदेंनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार पाडून भाजपला सत्ता थाळीत सजवून दिली होती. शिंदेंनी आपल्याबरोबर मोठ्या संख्येने काँग्रेस आमदारही भाजपच्या गोटात नेले होते.

अधिक वाचा :

याचबरोबर जितीन प्रसाद हे एकेकाळी राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचा वारे वाहू लागल्यानंतर भाजपमध्ये उडी मारली.

त्या २३ नेत्यांनाही संदेश

राहुल गांधी यांनी आजच्या वक्तव्यातून पक्षातील २३ मतभेद असलेल्या नेत्यांनाही एकप्रकारे संदेश दिला. या २३ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

त्यांनी पक्षाला पूर्णवेळ नेत्याची आणि सामुहिक निर्णय प्रक्रियेची गरज असल्याचे म्हटले होते.

वक्तव्य प्रशात किशोरांनाही लागू?

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे अनेक जाणकार अजून एक अर्थ काढत आहेत.

राहुल यांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना अप्रत्यक्ष आमंत्रण असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांची भेट घेतली होती.

त्यावेळी त्यांच्यात प्रशांत किशोर यांना पक्षात एखादा महत्वाचा रोल देण्याबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांनी सांगितले.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कोरोना लसीकरण, ऑषधोपचार आणि त्यांचे पेटंट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news