राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले झाले आहेत.
कोल्हापूरातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस सतत मुसळधार पावसाने सुरूवात केली आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे आज सकाळच्या सुमारास धरणाचे दोन दरवाजे उघडले.
उघडण्यात आलेल्या दोन्ही दरवाज्यातून २८५६ आणि वीज गृहातून १४०० असा एकूण ४२५६ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.
धरणाचा बुधवारी (दि. ४) रोजी सकाळी १०.२८ वाजता गेट नंबर ६ आणि १०.३४ वाजता गेट क्रं. ३ दरवाजा खुला झाला. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जूनपासून आज अखेरपर्यत ३२९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेल्या आठवड्यात पावसाने झोडपले होते. कोल्हापूरात आलेल्या पुराच्या दरम्यान अनेक नागरिकांचे स्थलांतरण केले होते. याशिवाय काही नागरिकांचे मोठे नुकसान होवून मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जिवितहानीसुध्दा झाली होती.
हेही वाचलंत का?
पाहा : पुराने ओढवलेल्या भयाण परिस्थितीतून जातंय महाड