यवत; पुढारी वृत्तसेवा : कुरियरचे नाव वापरून पुणे, सोलापूर व पुणे, बंगळूर या महामार्गवरून एसटी बसमधून दररोज कोट्यवधी रुपयांची वाहतूक होत असल्याचे दिसत आहे.
३ ऑगस्टला पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड, जि. पुणे) परिसरात १ कोटी १२ लाख रुपयांची रोकड लंपास झाल्यानंतर ही चोरटी वाहतूक पुन्हा एकदा उजेडात आली आहे.
पुणे, मुंबईतील काही व्यापारी, व्यावसायिक या कुरियरवाल्यांचे गिऱ्हाईक असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाचविण्यासाठी हा चोरटा पर्याय काही व्यापारी मंडळीनी निवडला आहे.
रोख रक्कम, सोन्याची बिस्कीटे, चांदी आणि हिरे या गोष्टींची चोरटी वाहतूक केली जात आहे. मोठा व्यापारी असेल तर किमान या कुरियरमुळे शासनाचा महसूल किमान तीन ते चार लाख रुपये दररोज बुडवत आहेत.
'पकडला तर चोर नाही तर साव' असा हा व्यवसाय असल्याने कुरियर चालवणारे देखील कोट्यावधी रुपयांत खेळत आहेत.
पुणे, मुंबई भागात याच कुरियर व्यवसायाला हवाला म्हणतात.
तर सातारा, सांगली भागात याला आगडिया या नावाने ओळखलं जातं.
सातारा व सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील पोरांना तोकड्या पगाराची हवाल्यात नोकरी देतात.
मात्र हा हवाला चालवणारे गलेलठ्ठ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एसटीबसचा प्रवास अशी वाहतूक करण्यासाठी सर्वात सुरक्षित प्रवास मानला जातो.
कारण हे शासकीय वाहन असल्याने सहसा कुठेही गाडी तपासली जात नाही.
काही प्रमाणात लक्झरी बसच्या प्रवासाला सुद्धा यात प्राधान्य दिले जाते.
अशी चोरटी वाहतूक रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा देखील काहीच करू शकत नाही.
एका एसटी बसमध्ये किंवा लक्झरी बसमध्ये साधारणपणे ५० हुन अधिक प्रवासी असतात.
या सर्व प्रवाशांच्या बॅगा तपासणी करणे पोलिस यंत्रणेला शक्य नाही या गोष्टीचा फायदा घेऊन ही वाहतूक केली जात आहे.
हे ही पाहा :