मुक्ता बर्वे-उमेश कामत येणार ‘कोण होणार करोडपती’मध्ये

उमेश कामत -मुक्ता बर्वे
उमेश कामत -मुक्ता बर्वे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सगळ्यांचे लाडके कलाकार मुक्ता बर्वे-उमेश कामत एकत्र येणार आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या, विशेष भागामध्ये मुक्ता बर्वे-उमेश कामत दोघांची एंट्री होणार आहे.

अधिक वाचा-

उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी हे दोघे ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत.
मंचावर सचिन खेडेकर यांच्याशी त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. आपल्या उमेदीच्या काळापासून आत्तापर्यंतचा प्रवास अभिनेत्रीने सांगितला. तर कामतनेही आपल्या एका गंमतीशीर किश्शाला उजाळा दिला.

अधिक वाचा-

मुक्ता बर्वे-उमेश कामत
मुक्ता बर्वे-उमेश कामत

'अजूनही बरसात आहे' या मालिकेत दोघे एकत्र

'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून कामत आणि बर्वे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 'माउली सेवा प्रतिष्ठान' ही संस्था गेली पंधरा वर्षं कार्यरत आहे. आजारी, बेघर, बेवारस अशा महिलांना कायम स्वरूपाचे उपचार आणि निवारा देण्यासाठी 'मनगाव' हा प्रकल्प चालवते.

अधिक वाचा-

समाजाने, आप्तस्वकीयांनी नाकारलेल्या आया-बहिणीचं मनगाव हे कायमस्वरूपी घरटं आहे. आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य जाणून हे दोघे या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर आले आहेत.

पाहा, 'कोण होणार करोडपती' – विशेष भाग, ४ सप्टेंबर, शनिवार, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news