ब्लॅक इज ब्युटिफुल म्हणत अमृता खानविलकर हिने लावलं वेड

ब्लॅक इज ब्युटिफुल म्हणत अमृता खानविलकर हिने लावलं वेड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चॉकलेट गर्ल अमृता खानविलकर हिचे ग्लॅमरस फोटोज काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत होते. गेले अनेक दिवस अमृता खानविलकर वेगवेगळे फोटोशूट करत आहे. आता तिने नव्या अंदाजात फोटोशूट केला आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

अमृता खानविलकरचं काळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य
अमृता खानविलकरचं काळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य

राझी, नटरंग, गैर यांसारख्या चित्रपटातून तिने कसदार भूमिका साकारल्या. नटरंगमध्ये 'वाजले की बारा' लावणी करत तिने प्रेक्षकांना डोलायला लावले.

अमृताने मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्याचबरोबर, बॉलिवूडमध्येही तिने आपला दबदबा निर्माण केला. राझीसारखा चित्रपट करून तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

अमृता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नियमितपणे योगा करते.  फिट राहण्याकडे लक्ष देते.

अमृताचे आणखी काही फोटो पाहा
अमृताचे आणखी काही फोटो पाहा

आता तिने काळ्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या साडीतील खूप सारे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपचं सुंदर दिसते आहे. आता तिचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांच्या पसंती उतरतोय.

नवनवीन अंदाजातील तिचा फोटोशूट लक्ष वेधून घेतोय. तिने एका फोटोला कॅप्शन दिली आहे की-'ब्लॅक इज ब्युटिफुल.'

काळ्या रंगाची साडी. एका बाजूला पदर सोडलेला आणि केसांच्या अंबाड्यात गजरा माळलेल्या अमृताचे कमालीचे सौंदर्य दिसत आहे.
केवळ मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नव्हे तर तिने 'खतरोंके खिलाडी'सारख्या थ्रील शोमध्ये जोरदार प्रदर्शन केलं आहे.

तिने छोट्या पडद्यावर 'जिवलगा' मालिका केली. पण, ती सध्या पडद्यावर दिसत नाहीय. अमृता पुन्हा कधी प्रेक्षकांच्या भेटीली येणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news