अजय बहल याने ‘या’ कारणासाठी मानले नैनीतालच्या लोकांचे आभार | पुढारी

अजय बहल याने 'या' कारणासाठी मानले नैनीतालच्या लोकांचे आभार

पुढारी ऑनलाईन : तापसी पन्नूने मागील महिन्यात प्रोडक्शन हाउस आउटरायडर्स फिल्म्सचे अनावरण केले. तापसीने गुलशन देवैयासोबतच्या शूटिंगसाठी नैनीतालची वाट धरली होती. नैनीतालमध्ये आलेला अनुभव दिग्दर्शक अजय बहल याने सांगितला आहे. नैनीतालमध्ये शूट करताना काय काय अनुभव आला. या गोष्टी अजय बहल याने शेअर केल्या आहेत.

बहलने सांगितले की, “नैनीताल कदाचित भारतातील पर्यटकांनी गजबजलेल्या सर्वात सुंदर जागांपैकी एक आहे. ‘ब्लर’च्या स्क्रिप्टला या अशाच लॅंडस्केपची गरज होती. आम्ही शूटिंगसाठी मॉल रोड आणि नैनीताल झीलसारख्या सुयोग्य जागा यासाठी निवडल्या होत्या.

या दोन्ही जागा स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी गजबजलेल्या असतात. तापसीसारख्या लोकप्रिय कलाकारासोबत अशा वास्तविक स्थानांवर शूटिंग करणे खरोखरच आव्हानात्मक असते.

पण, इथल्या स्थानिकांनी संयम बाळगला. शूटिंग संपेपर्यंत सेल्फी घेणे किंवा ऑटोग्राफ घेण्यासाठी वाट पाहिली. मला या शहरातील लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी आमच्या या शूटिंगसाठी याला इतके सुविधाजनक बनवले.

बहल पुढे म्हणाले की, ब्लरची टीम लोकेशनवर जास्त गर्दी असल्याकारणाने रात्री शूटिंग करत होती. नैनीताल झील आणि मॉल रोडसारख्या स्थानांवर करण्यात आलेले शूटिंग सुंदर प्राकृतिक दृश्यांचे संकेत देतात. जे दर्शकांना चित्रपट बघताना नक्कीच जाणवेल.

चित्रपट ‘ब्लर’ अजय बहलद्वारे दिग्दर्शित आहे. तापसी आणि गुलशन देवैया मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ-कोल्हापूरकरांनी जपलीय स्वातंत्र्यवीरांची रक्षा

Back to top button