मुंबई; पुढारी ऑनलाईन : तुफान हा बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याचा बहुप्रतिक्षित चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. तुफान हा चित्रपट २४० हून अधिक देशात प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात फरहानची भूमिका खूप खास आहे. या चित्रपटात फरहानने डोंगरी गुंडापासून ते राष्ट्रीय स्तराचा बॉक्सर होण्यापर्यंतच्या प्रवास दाखविला आहे.
अधिक वाचा
चित्रपटाची स्टोरी
'तुफान' या चित्रपटात अनाथ आश्रमात वाढलेला अजजू उर्फ अजीज अली (फरहान अख्तर) हा गुंड असल्याचे दाखविण्यात आले आहे. फरहान हा मनाने चांगला असतो, पण परिस्थितीमुळे त्याला गुंड होण्याची वेळ येते.
अधिक वाचा
फरहान अख्तर चित्रपटात जेव्हा डॉ. अनन्या प्रभू (मृणाल ठाकूर) हिला भेटतो. यानंतर त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते.
याच दरम्यान फरहान आणि मृणाल या दोघांना एकमेकांवर प्रेम होते. येथूनच गुंड आणि एका डॉक्टरची प्रेमकथा सुरू होते. फरहान म्हणजे, अजीज राष्ट्रीय स्तरावरचा बॉक्सर होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो.
अधिक वाचा
आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी तो प्रशिक्षक नाना प्रभू (परेश रावल) यांची मदत घेतो. आणि तो डोंगरी भागातून दिल्लीपर्यंत पोहोचतो. याच दरम्यान क्रिडा संघामधील होणारा भ्रष्टाचार दर्शविण्यात आलेला आहे.
'तुफान' या चित्रपटाची कथा अंजुम राजाबली यांनी लिहिली आहे. या चित्रपटात फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूर, रितेश सिधवानी आणि परेश रावल यांनी भूमिका साकारल्या आहेत. यासोबत या चित्रपटात फरहान याचे धमाकेदार डॉयलॉग पाहायला मिळते.
हेही वाचलंत का?