मुंबई; पुढारी ऑनलाईन : देवमाणूस ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका चर्चेत आहे. देवमाणूस आता एका विलक्षण वळणावर आली आहे. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते. पण, त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. देवमाणूस ही चांगुलपणाचा बुरखा पांघरणाऱ्या व्यक्तीवर आहे. घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ही मालिका आहे.
अधिक वाचा –
देवमाणूसमध्ये चतुराईने डॉक्टर त्याच्यावर लावलेले आरोप खोटे ठरवतो. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडतो.
देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहोत, हे पटवून देतो. ठोस पुराव्यांअभावी कोर्ट देखील अजितकुमारची सुटका करणार. अशातच एका नवीन व्यक्तिरेखेची एंट्री होते.
अधिक वाचा –
चंदा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री माधुरी पवार साकाणार आहे.
टीव्हीवर अजित कुमारची निर्दोष सुटका होणार का? ही बातमी पाहून चंदा गोंधळात पडते. चंदाचा चेहरा पाहून अजित कुमारची शुद्ध हरपते.
ही चंदा नक्की आहे तरी कोण? हिचा आणि देवीसिंगचा काय संबंध आहे? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
अधिक वाचा –
माधुरी पवार म्हणाली, मालिका अत्यंत रंजक वळणावर आली आहे. माझी चंदा या व्यक्तिरेखेतून एंट्री होणार आहे. म्हणून खूप जास्त उत्सुक आहे.
चंदा आणि देवीसिंग हे एकमेकांना ओळखतात. पण, ते एकमेकांना कसे ओळखतात.
त्यांचा काय संबंध आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.
चंदा ही एका वेगळ्या शैलीची व्यक्तिरेखा आहे. ही भूमिका निभावताना मला थोडंसं दडपण होतं. पण, संपूर्ण टीमने मला सांभाळून घेतलं. प्रेक्षक या भूमिकेवर देखील प्रेम करतील मला खात्री आहे.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ-"ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…" | हेमांगी कवी Exclusive