पलक तिवारीला नेटकरी म्हणताहेत, काश मेरा फिगर भी ऐसा होता

पलक तिवारीला नेटकरी म्हणताहेत, काश मेरा फिगर भी ऐसा होता

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही 'रोजी: द सैफरन चैप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या शुंटिगमध्ये सध्या पलक बिझी आहे. याच दरम्यान पलक तिवारीने आपल्या आईला मागे टाकत हटके फोटोशूट केले आहे.

पलक तिवारीने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्राम अकांऊटवर काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत पलक डेनिम शॉर्ट जॅकेट आणि ऑफ व्हाईट रंगाची पॅंट आणि टॉप घातला असून खुर्चीवर बसलेली दिसत आहे.

खूपच ग्लॅमरस दिसते पलक

फोटोतील पलकच्या लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे. या फोटोत ती खूपच कूल आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोसोबत पलकने खास असे ईमोजी शेअर केला आहे.

या फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या फोटोवर चाहते वेगवेगळ्या कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात एका नेटकऱ्याने 'हॉट' तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने 'सुंदर, अप्रतिम' अशी हटके कॉमेंन्ट केली आहे.

यासोबत आणखी एका नेटकऱ्यांने 'काश मेरा फिगर भी ऐसा होता, माझ्यावर लक्ष केंद्रीत करा,' असे देखील म्हटले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी हास्याचा, आगीचा आणि प्रेमाचा असे ईमोजी शेअर केले आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारीसोबत पलक देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती नेहमी आपले हटके फोटो शेअर करत असते.

याआधी काही दिवसापूर्वी श्वेता तिवारी हॉट आणि सेक्सी फोटोंनी चर्चेत आली होती. यावेळी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते.

हेही वाचलं का?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news