पणजी : विशेष टपाल, तिकिटांद्वारे महिलांना अभिवादन

पणजी : विशेष टपाल, तिकिटांद्वारे महिलांना अभिवादन
Published on
Updated on

पणजी : पिनाक कल्लोळी

महिलांचा उचित सन्मान करण्यासाठी भारतीय टपाल खात्याने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. त्यापैकी एक म्हणजे विशेष टपाल, तिकिटांद्वारे कर्तृत्वत्वान महिलांची आठवण जागविणे. खात्याने आजपर्यंत हजारो महिलांवर अशी तिकिटे काढली आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांवरील काही विशेष टपाल, तिकिटांची थोडक्यात माहिती.

स्वातंत्र्यानंतर टपाल खात्याने महिलांवर 150 पेक्षा अधिक विशेष टपाल आणि तिकिटे काढली आहेत. टपाल खात्याने 21 नोव्हेंबर 1947 रोजी संत मीराबाई यांच्यावर टपाल तिकीट काढले होते. महिलांना सैन्यात कायस्वरूपी कमिशन देण्यात आल्यावर 15 जानेवारी 2022 रोजी विशेष तिकीट काढण्यात आले.

स्वतंत्र भारताच्या तिकिटावर पहिली महिला संत मीराबाई होत्या. टपाल खात्याने स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेल्या, राजकारणात नाव कमावलेल्या, शात्रज्ञ, कलाकार व अन्य क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांची आठवण तिकिटांद्वारे जागविण्याचा प्रयत्न केला आहे. राणी चेन्नम्मा, बेगम हजरत महल, भिकाईजी कामा, सरोजिनी नायडू यांच्यावर तिकिटे काढण्यात आली आहेत.

टपाल खात्याने 1960 साली राजा दुष्यन्ताची पत्नी आणि सम्राट भरतची आई शकुंतला, 1963 साली महिला हक्क कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अ‍ॅनी बेझंट, 1964 साली महत्मा गांधी यांची पत्नी कस्तुरबा गांधी, 1964 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू, 1968 साली सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर निवेदिता, 1977 साली स्वातंत्र्यसेनानी राणी चेन्नमा, 1984 साली पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, 1987 साली प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार रुक्मिणी देवी यांच्यावर तिकीट काढली.

राणी लक्ष्मीबाई, कमला नेहरू, समाजसेविका दुर्गाबाई देशमुख, गोंडवानाची राणी दुर्गावती, अरुणा असफ अली, मॅडम भिकाजी कामा, अहिल्याबाई होळकर, सुभद्रा कुमारी चौहान, सुभद्रा जोशी, विजयालक्ष्मी पंडित, सावित्रीबाई फुले, डी. के. पट्टमल, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, एम. एल. वसंतकुमारी, अभिनेत्री मीना कुमारी, नूतन, लीला नायडू, देविका राणी, सावित्री देवी, कानन देवी, मीना कुमारी, नूतन, तेलगू अभिनेत्री सावित्री आदींवर तिकिटे काढली आहेत.

लिबिया लोबो सरदेसाई यांच्यावर विशेष टपाल पाकीट

टपाल खात्याच्या गोवा विभागाने 17 डिसेंबर 2021 रोजी गोवा मुक्तीच्या लढ्यात सहभाग घेतलेल्या लिबिया लोबो सरदेसाई यांच्यावर विशेष टपाल पाकीट काढले होते. लिबिया यांनी व्हॉइस ऑफ फ्रिडम नावाचे भूमिगत रेडिओ सेवा सुरू केली होती. याद्वारे त्या सर्वसामान्य जनतेला मुक्ती लढ्याची माहिती देत असत.

टपाल खात्याने वेळोवेळी कर्तृत्ववान महिलांवर तिकिटे काढून त्यांचा सन्मान केला आहे. यातील अनेक तिकिटे माझ्या संग्रहात आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर मूळच्या गोव्याच्या होत्या. त्यांच्यावर विशेष टपाल अथवा तिकीट काढण्यात यावे. याबाबत टपाल खात्याशी चर्चा करणार आहोत.

डॉ. रमेश कुमार,
अध्यक्ष, गोवा फिलाटली आणि न्युमिस्मॅटिक्स संस्था

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news