कोल्हापूर :  थेट पाईपलाईन मे अखेरीस पूर्ण

कोल्हापूर :  थेट पाईपलाईन मे अखेरीस पूर्ण
Published on
Updated on

कोल्हापूर :  पुढारी वृत्तसेवा : कोणतीही करवाढ नसलेला कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी प्रशासनाने सादर केला. महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण 988 कोटी 31 लाखांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्यास मंजुरी दिली. येत्या वर्षात मे अखेरपर्यंत काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण होईल, अशी माहिती डॉ. बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर शहरास कायमस्वरूपी शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. 425 कोटींची योजना असून काम सुरू आहे. धरण क्षेत्रातील जॅकवेल व इतर कामे प्रगतीपथावर आहेत. पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र शासन व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.

महापालिका हिश्श्याची रक्कमही उपलब्ध करण्यात आली आहे. एकूण योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, असेही डॉ. बलकवडे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news