गोरेगाव येथे गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य

गोरेगाव येथे गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतात फुले देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन गतिमंद मुलावर एका व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस शुक्रवारी मध्यरात्री अटक केली आहे.

गोरेगाव येथील एक अल्पवयीन गतिमंद मुलगा इतर मित्रांसोबत बुधवारी दुपारी गावालगत असलेल्या शेतात फुले तोडण्यासाठी गेला होता.

शेतात असलेल्या प्रकाश जाधव याने त्या गतिमंद व अल्पवयीन मुलास 'तिकडे जास्त फुले आहेत, तुला फुले देतो' असे अमिष दाखवले.

त्यानंतर त्याला तुरीच्या शेतात नेले.

त्यानंतर त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केले. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर प्रकाश याने तेथून पळ काढला.

तर तो गतिमंद मुलगा घरी आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. मात्र त्याला नेमका प्रकार घरी सांगता येत नव्हता.

मात्र त्रास वाढल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. त्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या त्या मुलाच्या कुटुंबियांनी शुक्रवारी सायंकाळी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली.

त्यावरून पोलिसांनी प्रकाश जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

त्यानंतर शुक्रवारी रात्री प्रकाश यास अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी आळंदीतही घडली होती घटना

आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलावर वारकरी शिक्षण संस्था चालक महाराजाने काही दिवसांपूर्वी अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी महाराजावर गुन्हा दाखल झाला होता. लहू अर्जुन गायकवाड (रा. सिद्धेबेट, मूळ गाव जांगलादेवी, घनसांगवी, जि. जालना) असे संशयिताचे नाव आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news