कोरोना उपचार : दिरंगाई रुग्णांच्या जीवावर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

कोल्हापूर;  सतीश सरीकर : कोरोना उपचार दिरंगाई जिल्ह्यावर बेतली आहे. कोरोना व्हायरसची जिल्ह्यातील सद्य:स्थितीत तब्बल 20 टक्के मृत्यू होत आहेत. हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या 24 तासांत मृत्यू होत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून ही धक्‍कादायक बाब समोर समोर आली आहे. या व्हायरस उपचारात दिरंगाई करू नका. कारण, अशा वेळी रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. व्हायरसची लक्षणे जाणवू लागल्यानंतर किंवा पॉझिटिव्ह आल्यानंतरही डॉक्टरांकडून औषध घेऊन काही जण घरीच राहात आहेत.

कोरोना उपचार करण्यासाठी काही जण खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होत. परंतु सुरुवातीचे काही दिवस आजारपण अंगावरच काढल्यामुळे ते अत्यवस्थ होतात. दम लागतो.

अधिक वाचा – 

परिणामी, उपचाराला प्रकृती साथ देत नाही. त्यातच संबंधितांचा मृत्यू होतो. केवळ वेळेत हॉस्पिटलायझेशन न झाल्याने अनेकांना अशाप्रकारे जीव गमवावा लागत आहे.

अधिक वाचा – 

व्हायरसची लक्षणे दिसत असतानाही अनेकजण स्वॅब टेस्ट करून घेत नाहीत.

सुरुवातीला सर्दी-तापावर खासगी डॉक्टरकडून औषधे आणून घेतली जातात.

त्यातूनही ताप कमी नाही आला तरच स्वॅब टेस्ट करण्यात येते. परंतु तोपर्यंत काही दिवस निघून जातात.

टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतरही वेळ जातो. त्यातच रुग्णाची ऑक्सिजनची पातळी कमी होते. परिणामी हॉस्पिटलमध्ये दाखल होतानाच संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर बनलेली असते.

अधिक वाचा- 

ऑक्सिजन पातळी 50 ते 70 पर्यंत खाली आलेली असते. धापा टाकत हॉस्पिटलमध्ये गेलेल्या रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवरच ठेवायला लागते.

शरीरात मोठ्या प्रमाणात विषाणूंचा संसर्ग झाल्याने आणि औषधोपचाराला प्रकृती साथ देत नसल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

काही वेळा खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलविले जाते.

त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू संख्येचा आकडा वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

अद्यापही दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. मृत्यूची संख्याही रोज 30 ते 50 च्या या दरम्यान आहे.

4960 मुले-मुली ठणठणीत

दुसर्‍या लाटेत 1 जानेवारी ते 10 जुलै या कालावधीत 2712 मुले व 2248 मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी काहीजण होम आयसोलेट झाले.

अनेकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. ही सर्व दहा वर्षापर्यंतची मुले-मुली आहेत.

सुदैवाने यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. दु:खाच्या छायेतही लहान मुलांच्या बाबतीत कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 4960 मुला-मुलींनी कोरोनावर मात करून ठणठणीत बरे झाले आहेत.

हॉस्पिटलमध्ये उशिरा आल्याचा परिणाम

काही रुग्ण घाबरून काही सांगत नाहीत. घरातच उपचार घेतात. हॅप्पी हायपोक्सियामुळे ऑक्सिजन पातळी कमी झालेले रुग्णाला समजत नाही. मग असे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उशिरा दाखल होतात.

अ‍ॅडमिट झालेल्या संबंधित रुग्णाला ऑक्सिजन किंवा थेट व्हेंटिलेटर लावायला लागतो. उपचारासाठी प्रकृती साथ देत नसल्याने अनेकदा रुग्णाचा मृत्यू होतो.

त्यामुळे आजारी पडल्यानंतर रुग्णांनी तत्काळ स्वॅब टेस्ट करून घ्यावा. त्यानंतरच इतर उपचार सुरू करावेत, असा सल्‍ला डॉ. संगीता निंबाळकर यांनी दिला.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news