कोयना नदी धोका पातळीकडे; १७२ कुटुंब सुरक्षितस्थळी रवाना

खोडशी : खोडशी बंधारा भरून सांडव्यावरुन तीन फुटांनी पाणी वाहू लागले आहे. (छाया : विशाल फोटो)
खोडशी : खोडशी बंधारा भरून सांडव्यावरुन तीन फुटांनी पाणी वाहू लागले आहे. (छाया : विशाल फोटो)

कराड;  पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून सुरू असणार्‍या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. कृष्णा, कोयना नदी ला पूर आला आहे. कोयना नदी ने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे कूच केली आहे.

अधिक वाचा- 

खोडशी बंधारा भरून सांडव्यावरून तीन फुटांनी पाणी वाहू लागले आहे. तांबवे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. शहरासह तालुक्यातील १७२ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

दरम्यान पूरसदृश्य स्थितीत मदतीसाठी एनडीआरएफचे पथक कराड येथे दाखल झाले आहे. तसेच पाटण तालुक्यातील आंबेघर व मिरगावला भूस्खलन झाल्याने संबंधित पथकाला तेथे मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

कराड येथे कोयना पुलाजवळ इशारा पातळी 45 फूट इतकी आहे. तर धोका पातळी 58 फूट आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता येथे पाणी उंची 46 फुटापर्यंत नोंदली गेली आहे.

कृष्णा पुलाजवळ इशारा पातळी 45 फूट इतकी आहे. तर धोका पातळी 56 फूट इतकी आहे. येथे पाणी उंची 36 फूट इतकी नोंदली गेली आहे. कृष्णा पुलाजवळ पाण्याचा विसर्ग 1 लाख 14 हजार 773 एवढा आहे.

अधिक वाचा – 

तांबवे पूल गुरुवारी रात्री पाण्याखाली गेला होता. सकाळी पाऊस कमी झाल्यानंतर पाणी कमी झाले होते. पण कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हा पूल पाण्याखाली गेला.

कराड ः कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून जुन्या पुलाला पाणी लागले आहे.
कराड ः कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून जुन्या पुलाला पाणी लागले आहे.

कराड प्रीतिसंगम घाटावरील मंदिरे पाण्याखाली

दरम्यान, कराड प्रीतिसंगम घाटावरील मंदिरे पाण्यात गेली आहेत.

ओढे, नाले तुडंब भरून वाहू लागले असून महामार्गाजवळील सर्व्हिस रस्ते ठिकठिकाणी पाण्याखाली गेले आहेत.

त्यामुळे सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कराड शहरातील पाटण कॉलनीतील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पूरसदृश्य स्थितीत मदतीसाठी एनडीआरफएचे पथक कराड येथे दाखल झाले आहे.

तसेच पाटण तालुक्यतील आंबेघर व मिरगावला भूस्खलन झाल्याने या पथकाला तेथे मदतीसाठी पाचारण केले आहे. पावसाची संततधार कायम आहे.

पाहा व्हिडिओ – कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news