कोण होणार करोडपती : सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची एन्ट्री

कोण होणार करोडपती
कोण होणार करोडपती

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कोण होणार करोडपती च्या कर्मवीर विशेष भागमध्ये सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची एन्ट्री होणार आहे. कोण होणार करोडपती कर्मवीर विशेष भाग ३१ जुलैला पाहायला मिळणार आहे. शनिवार, रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर हा भाग पाहा.

अधिक वाचा : 

भास्करराव हे पाटोदा/गंगापूर नेहरी या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावाला 'आदर्श गाव' पुरस्कार मिळाला आहे.

गावाला आतापर्यंत विविध २२ पुरस्कारही मिळाले आहेत. दर १५ मिनिटांवर हात धुण्याची सोय, स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स उपाययोजना राबवल्या आहेत.

अधिक वाचा- 

शेतीसाठी गावात पाणी आणण्याची सोय, एक गाव एक गणपती योजना, अद्ययावत शाळा; असे अनेक उपक्रम भास्कररावांनी आपल्या गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी राबवले आहेत.

अधिक वाचा – 

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून भास्कररावांचा सन्मान झाला आहे. या आदर्श गावाला अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांनी भेट दिली आहे.

अधिक वाचा – 

कर्मवीर विशेष भागामध्ये जिंकलेली सर्व रक्कम भास्करराव आपल्या गावातल्या रहिवाशांसाठी आणि गावाच्या विकासासाठी वापरणार आहेत.

हे देखील वाचलंत का? –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news