पुढारी ऑनलाईन : नवी दिल्ली : केंद्र सरकारने झायडस कॅडिला कंपनीने बनवलेल्या ZyCoV-D या व्हॅक्सिनसाठी मागणी नोंदवली असून, महाराष्ट्रासह ७ राज्यांत हे व्हॅक्सिन दिले जाणार आहे. हे व्हॅक्सिन सुईशिवाय दिले जाते. याचे एकूण ३ डोस घ्यावे लागणार आहेत.
१) हे व्हॅक्सिन १२ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना दिले जाणार आहे; पण सुरुवातीला हे व्हॅक्सिन प्रौढांना दिले जाईल. व्हॅक्सिनची उपलब्धता वाढल्यानंतर ते मोठ्या मुलांना दिलं जाईल..
२) हे व्हॅक्सिन देण्यासाठी विशिष्ठ असे ॲप्लिकेटर लागते. सुईशिवाय ही लस घेता येणार.
३) प्लाजमिड DNA या तंत्रावर हे व्हॅक्सिन बनवले आहे. अशा प्रकारे बनवलेले हे जगातील पहिले व्हॅक्सिन आहे.
४ ) १२ ते १८ वयोगटातील मुलांवर या व्हॅक्सिनची चाचणी घेण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये या व्हॅक्सिनची प्रभाव क्षमता ६६.६६ टक्के दिसून आली आहे.
५) हे व्हॅक्सिन साधारण तापमानातही ३ महिनेपर्यंत सुरक्षित राहते. इतर व्हॅक्सिनसाठी कोल्ड स्टोरेज आवश्यक असते.
६) पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीत हे व्हॅक्सिन अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आलं आहे.
१ ) हे व्हॅक्सिन स्नायूत दिले जाते. त्यासाठी सुई वापरता येत नाही.
२ ) पहिले व्हॅक्सिन घेतल्यानंतर २८ आणि ५६ दिवसांनंतर पुढचे डोस घ्यावे लागतात.
३ ) केंद्र सरकारने ३५८ रुपयेला १ अशा दराने हे व्हॅक्सिन विकत घेतले आहे.