Jharkhand Floor Test : झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Zarkhand Vote of Trust
Zarkhand Vote of Trust
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंडमधील प्रचंड राजकीय उलथापलथीनंतर 'झामुमो'चे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर राज्यपालांनी चंपाई सरकारला बहुमत साध्य करण्यास सांगितले. यानुसार आज
( दि.५) सोरेन सरकारने ४७ आमदारांच्या पाठींब्याने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर विधानसभेत आवाजी मतदाने चंपाई सोरेन सरकारवर पुन्हा शिक्कामोर्तब झाला. अखेर झारखंड मुक्ती मोर्चाला सरकार अबाधित ठेवण्यात यश आले आहे. (Jharkhand Floor Test)

हेमंत सोरेन यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या जागी 'झामुमो'चे चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर या सरकारला राज्यपालांनी सोमवारी (दि.५) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. दरम्यान आज ४७ आमदारांच्या पाठींब्याने चंपाई सोरेन यांनी झारखंड विधानसभेत बहुमताची चाचणी पास केली. यावेळी विरोधी गटात २९ आमदार होते. त्यानंतर विधानसभा अध्‍यक्ष रवींद्र नाथ महतो यांच्या समोर आवाजी मतदानाने  सभागृहात विश्‍वास दर्शक ठराव मंजूर झाला. (Jharkhand Floor Test)

हेमंत सोरेनही मतदानासाठी सभागृहात

झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. परंतु, चंपाई सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या बहुमत चाचणीसाठी ते उपस्थित होते.  ईडीने हेमंत सोरेन यांना राज्य विधानसभेतील बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. यानुसार, ते  सीएम चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विश्‍वास दर्शक ठरावावेळी मतदानासाठी सहभागी झाले होते. (Jharkhand Floor Test)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news