पुढारी ऑनलाईन डेस्क : Hemant Soren Resignation : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी चौकशीचा फास आवळला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजिनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यामुळे चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे. (Hemant Soren's wife Kalpana Soren become the next chief minister of Jharkhand)
हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होण्याची भीती होती. मंगळवार, ३० जानेवारी रोजी त्यांनी झामुमो आणि सत्ताधारी आघाडीच्या आमदारांच्या बैठक घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या बैठकीला उपस्थित होत्या. त्यामुळे त्या मुख्यमंत्रीपद होतील अशी शक्यता शक्यता वर्तवली जात होती. पण हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री साडेआठनंतर राजिनामा दिल्यानंतर चंपाई सोरेन यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून समोर आले. (Hemant Soren Resignation)