हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे यमुना नदीची पाणी पातळी वाढली आहे. रविवारी सकाळी यमुनेची पाणी पातळी 205.75 मीटरवर होती. यापेक्षा पाणी वाढले तर दिल्लीत पुन्हा पूर येऊ शकतो. हथीनी कुंडातून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने नदीची पाणी पातळी 206.7 मीटरपर्यंत जाऊ शकते, असे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान हिंडन नदीलाही पूर आल्याने नोएडा येथे काही भागात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.