Bhagwat Geeta : कुरुक्षेत्रात स्थापन होणार जगातील सर्वांत मोठी गीता

Bhagwat Geeta : कुरुक्षेत्रात स्थापन होणार जगातील सर्वांत मोठी गीता
Published on
Updated on

चंदीगड; वृत्तसंस्था : हरियाणातील कुरुक्षेत्र या पौराणिक महत्त्व असलेल्या शहराच्या ज्योतीसरमध्ये जगातील सर्वांत मोठ्या गीतेची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, या ग्रंथाचे वजन 1000 किलो असेल. यूपो सिंथेटिक पेपरपासून हा ग्रंथ इटलीच्या मिलानमध्ये तयार करण्यात आला आहे. (Bhagwat Geeta)

महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथासारखे मंदिर कुरुक्षेत्रात प्रस्तावित असून, त्यात या ग्रंथाची प्रतिष्ठापना करण्यात येईल. ग्रंथाची सुमारे 700 पाने यंत्राने उलटावी लागणार आहेत. श्रीकृष्ण-अर्जुन यांची एकाचवेळी पूजा होईल, असे जगातील हे पहिलेच मंदिर असेल. (Bhagwat Geeta)

भगवान श्रीकृष्णांनी 5 हजार 160 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कर्मयोगाचा अमर संदेश दिला होता, त्याठिकाणी इस्कॉनतर्फे या मंदिराची उभारणी होत असून, ही गीता या मंदिराची शोभा असेल. (Bhagwat Geeta)

मंदिराची वैशिष्ट्ये

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या मंदिरातून केला जाणार आहे.
  • मंदिरात एकाच वेळी 600 भाविकांना कीर्तन करता येणार आहे.
  • मंदिराचे बांधकाम यंदा डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबईत तयार झाले घोडे

मंदिरासाठी 40 फूट लांब आणि 30 फूट उंचीचे घोडे मुंबईत तयार करण्यात आले आहेत.

पवित्र गीता मंदिराचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– महंत साक्षी गोपाल दास, व्यवस्थापक, गीता मंदिर, कुरुक्षेत्र.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news