Ajay Banga : भारतीय वंशाचे अजय बंगा बनले जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष; २ जून रोजी स्विकारणार पदभार

वॉशिंग्टन डीसी; पुढारी ऑनलाईन : भारतीय वंशाचे अजय बंगा (Ajay Banga) हे जागतिक बँकेचे (World Bank) पुढील अध्यक्ष असतील. बुधवारी (दि.३) अजय बंगा यांची अध्यक्षपदी (World Bank President) अधिकृत निवड झाल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केले. पुढील पाच वर्षांसाठी बँकेच्या बोर्ड सदस्यांनी त्यांना बंगा यांना मत देत त्यांची या पदी निवड केली. यानंतर जागतिक बँक समूह बंगा यांच्या सोबत काम करण्यात उत्सक असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Ajay Banga confirmed as next World Bank president)
अजय बंगा हे अधिकृतरीत्या २ जून रोजी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (World Bank chief David Malpass) यांच्याकडून पदभार स्विकारतील. मालपास यांनी जवळपास वर्षभरापुर्वी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या उमेदवारीला भारताने पाठिंबा दिला आहे. (Ajay Banga)
जन्म पुण्यात, शिमल्यातून घेतले शिक्षण (Ajay Banga)
जागतिक बँकेचे अध्यक्ष आणि मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा यांचे शिमल्याशी संबंध आहेत. पुण्यात जन्मलेल्या बंगा यांनी ७० च्या दशकात शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्याचे वडील सैन्यात अधिकारी होते. यादरम्यान ते काही काळ शिमल्यात तैनात होते. यादरम्यान अजय बंगा यांचे शिक्षण सेंट एडवर्ड स्कूल शिमला येथून झाले.
India-born Ajay Banga appointed as President of World Bank
Read @ANI Story | https://t.co/VXyLt69nix#WorldBank #WorldBankPresident #AjayBanga #DavidMalpass pic.twitter.com/127RwPjSMA
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2023
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अजय बंगा यांना मिळाला मोठा पाठिंबा
६३ वर्षांच्या अजय बंगा यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (U.S. President Joe Biden) यांनी जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नामांकन दिले होते. बंगा यांच्या समर्थनाच्या एका खुल्या पत्रात, ५५ वकील, शिक्षणतज्ज्ञ, अधिकारी, दिग्गज आणि माजी सरकारी अधिकारी यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकनाला पाठिंबा दिला होता.
बंगा यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये अनेक नोबेल विजेतेही होते. यामध्ये डॉ. जोसेफ स्टिग्लिट्झ (२००१ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालेले), डॉ. मायकेल स्पेन्स (२००१ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते) आणि प्राध्यापक मुहम्मद युनूस (२००६ चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते) यांच्या नावांचा समावेश आहे.
अधिक वाचा :