Puri Jagannath Temple : जगन्नाथ मंदिरातून दीडशे किलो सोने, अडीचशे किलो चांदी गायब?

Puri Jagannath Temple : जगन्नाथ मंदिरातून दीडशे किलो सोने, अडीचशे किलो चांदी गायब?
Published on
Updated on

भुवनेश्वर; वृत्तसंस्था : जगन्नाथ पुरी मंदिरातील रत्नांचा खजिना 39 वर्षांपासून बंद आहे. गेल्या वेळी तो अखेरचा 1984 मध्ये उघडण्यात आला होता. तिजोरीत 150 किलो सोने आणि 258 किलो चांदी आहे. खजिना आणि तिजोरी उघडावी आणि या संपत्तीचे लेखापरीक्षण करावे, अशी भाजपसह आणि काँग्रेसने केली आहे. ओडिशा हायकोर्टानेही या प्रकरणात राज्य सरकारकडून 10 जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे. (Puri Jagannath Temple)

…और चाबी खो जाये! (Puri Jagannath Temple)

  • 4 एप्रिल 2018 रोजी जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत रत्न भंडारच्या आतील खोलीची चावी गायब झाल्याचे उघड झाले.
  • 5 जून 2018 रोजी राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गहाळ चाव्यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले.
  • 13 जून 2018 रोजी तिजोरीची डुप्लिकेट चावी रेकॉर्ड रूममधून सापडली आहे, असे पुरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरविंद अग्रवाल यांनी सांगितले.
  • 29 नोव्हेंबर 2018 रोजी न्यायिक आयोगाने आपला 324 पानांचा अहवाल राज्य सरकारला सादर केला; पण सरकारने हा अहवाल सार्वजनिक केला नाही.
  • 7 डिसेंबर 2021 रोजी रत्न भंडाराची आतील खोली उघडण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे राज्य सरकारने सांगितले.

तिजोरीचा वाद काय?

रत्न भंडार राज्य सरकार (बिजू जनता दल) का उघडत नाही, या प्रश्नावर भंडाराच्या आतल्या खोलीची चावी मिळत नसल्याचे कारण सरकार सांगत आहे. आता राज्य सरकारला 10 जुलै रोजी ओडिशा उच्च न्यायालयात उत्तरे द्यायची आहेत. (Puri Jagannath Temple)

7 राज्यांत 60 हजार एकरवर जमीन

  • ओडिशा : 60,426 एकर, प. बंगाल : 322 एकर
  • महाराष्ट्र : 28 एकर, मध्य प्रदेश : 25 एकर,
  • आंध्र प्रदेश : 17 एकर, छत्तीसगड : 1.7 एकर, बिहार : 0.27 एकर.

तिजोरीची मूळ चावी गेली कुठे? डुप्लिकेट चावी आली कुठून? हायकोर्टाच्या आदेशानंतरही तपास पथकाला आतल्या खोलीत का जाऊ दिले नाही? आतली खोली उघडत का नाही? सोने-चांदी गायब केले की काय?
– पितांबर आचार्य, प्रवक्ता, भाजप

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news