Winter Session 2023: संसदेत विरोधकांची घोषणा आणि फलकबाजी; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब

Winter Session 2023
Winter Session 2023

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसद घुसखोरी आणि सुरक्षा भंग प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकारण वातावरण तापले आहे. संसद हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.१९) १२ वा दिवस आहे. दरम्यान सत्र सुरू होताच, लोकसभा सभागृहात विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक झाले. विरोधकांनी सभागृहातच जोरदार घोषणाबाजी करत, फलक दाखवले. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना इशारा देत, दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब केले. (Winter Session 2023)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज ( दि. १९ डिसेंबर) १२ वा दिवस आहे. तत्पूर्वी संसद घुसखोरी आणि संसद सुरक्षा भंग प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये वातावरण तापले आहे. दरम्यान दोन्ही सभागृहात विरोधक गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे अशी मागणी करत आहेत. पण याला सत्ताधारी सरकारकडून कोणताही सिग्नल मिळेना, त्यामुळे विरोधकांची अधिवेशन सत्रांमध्ये गदारोळ घातला. यावरून ९२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, निलंबित खासदारांनी मकरद्वार येथे सरकारविरोधात निदर्शने केली. तर विरोधी पक्षांच्या इतर खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. (Winter Session 2023)

अधिवेशनावर उर्वरित विरोधी खासदारांचा बहिष्कार?

संसदेच्या दोन्ही सभागृहात संसद घुसखोरी आणि लोकसभेच्या सुरक्षा उल्लंघनावरून वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांमध्ये खडाजंगी सुरू आहे. दरम्यान संसदेतील घोषणाबाजी आणि गदारोळ या कारणांवरून लोकसभा आणि सराज्यसभेतील जवळपास ९२ खासदारांना उर्वरित हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले आहे. खासदारांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षाने संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news