‘रणांगणात प्रत्यक्षात उतरण्याची वेळ, ‘INDIA’ आघाडीला नवा समन्वयक नियंत्रक चेहरा हवाय’ | पुढारी

'रणांगणात प्रत्यक्षात उतरण्याची वेळ, 'INDIA' आघाडीला नवा समन्वयक नियंत्रक चेहरा हवाय'

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑगस्टनंतर एकत्रित इंडियाची बैठक झाली नव्हती. तीन निवडणुकांचे निकाल, पुढे काय होणार यावर चर्चा होईल. पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये निवडणुका होतील, त्यानुसार, तयारीला लागायला पाहिजे. बैठकीत आपली मते मांडू, असे मत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत इंडियाच्या बैठकीत व्यक्त केले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते.

संबधित बातम्या –

ठाकरे म्हणाले, नव्या वर्षात जानेवारीत निवडणुकांचं बिगुल वाजेल. २०२४ च्या निवडणुकांसाठी तयारीला लागलं पाहिजे. देशाची लोकशाही वाचली पाहिजे, जर लोकशाही वाचली तर देश जगेल, यासाठी आम्ही इंडिया एकत्र आलोय. इंडिया आघाडीला नवा समन्वयक, नियंत्रक चेहरा हवाय. कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही. केजरीवाल अजिबात नाराज नाहीत. केजरीवालांशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झालीय. आम्हाला एकत्र येऊन देश वाचवायचा आहे. कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा नाही. आम्हाला एकत्र येऊन देश वाचवायचा आहे. आम्ही कोणत्याही भ्रमात नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, सामनाच्या अग्रलेखाचा चुकीचा अर्थ काढू नये. मतभेद सोडून इंडिया आघाडीमध्ये एकत्र आलोय. समन्वयकासाठी निमंत्रक हवा हाच मुद्दा आहे.मुख्यमंत्रीपद मी जबाबदारी म्हणून स्वीकारलं होतं. जेव्हा वेळ आली तेव्हा मी क्षणात सीएम पद सोडलं. वंचित संदर्भात चर्चा सुरु आहे, लवकरच वंचित संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. थंडीमुळे जॅकेट घातलंय, मी हुडी घालून फिरत नाही, असा टोलादेखील उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मारला.

Back to top button