छत्रपती संभाजीनगर : कापसाच्या शेतात लावली गांजाची झाडे; पोलिसांचा छापा, निमडोंगरी येथील घटना | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : कापसाच्या शेतात लावली गांजाची झाडे; पोलिसांचा छापा, निमडोंगरी येथील घटना

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निमडोंगरी शिवारात एका शेतकऱ्याने गांजाची झाडे लावल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्याने शेतात छापा मारला असता ३,३०,००० रुपयांची २७ गांजाची झाडे मिळून आल्याने शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण सपोनि तात्या रुपाजी भालेराव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू सोमनाथ मेंगाळ रा.निमडोंगरी याने आपल्या शेतात कापसाच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. १८ डिसेंबर रोजी सव्वासहा वाजेच्या सुमारास छापा मारला असता सुमारे तीन लाख तीस हजारांची २७ गांजाची झाडे सापडली. याप्रकरणी मेंगाळ या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि भालेराव, पोउपनि राम बाराहाते, बिट अंमलदार कैलास करवंदे, संजय आटोळे, शिवदास बोराडे, युसूफ शेख यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोउपनि बारहाते हे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button