हिमालय पर्वतरांगात बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून थंडीचा तडाखा (Winter Season) वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले असून कमाल तापमान 30 अंशांच्या आसपास नोंदविले जात आहे. हिमालयातून येत असलेल्या थंडगार वार्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत दिल्ली परिसरातील थंडीमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
केवळ दिल्लीच नव्हे तर उत्तर भारतातील हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सकाळच्या वेळचा गारवा वाढला (Winter Season) आहे. उत्तराखंडमध्ये डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत असून त्यामुळे मैदानी भागातील तापमान झपाट्याने कमी होऊ लागले आहे. देशाच्या अन्य भागाचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये सतत पाऊस पडत आहे. दक्षिण भारतात यंदा सरासरीपेक्षा 122 टक्के जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. तामिळनाडूबरोबरच केरळ, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, पुडुचेरी आदी ठिकाणी पाऊस पडत असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.