पोर्नोग्राफी केसमधून काही दिवसांपूर्वी तुरुंगाच्या बाहेर आलेल्या राज कुंद्रा (Shilpa Shetty post) ने नुकतीच सोशल मीडियावरील आपली सगळी अकाऊंट डिलीट केली. यानंतर काही वेळातच त्याची पत्नी शिल्पा शेट्टीने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.
या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीने 'बदल' आणि 'मोठे नुकसान' विषयी सांगितले आहे. तिची ही पोस्ट आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्वतःला शोधण्याच्या इशारा देते. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकातील एक पान शेअर केले असून त्यावर हार्ट इमोजी आहे. या पेजवर ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत, त्या राज कुंद्राच्या सोशल मीडिया अकाऊंट डिलीटवर फॅन्स जोडत आहेत.
"Wilderness of intuition.. आपले शहर सोडा आणि आपल्या अंतर्ज्ञानाच्या जंगलात जा. तिथे तुम्हाला जे मिळेल ते आश्चर्यकारक असेल. तेथे तुम्ही स्वत: सापडाल. आपण नेहमी आरामाकडे झुकतो. आपल्या आयुष्यात काही तक्रारी असू शकतात. गोष्टी परिपूर्ण नाहीत. पण आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत आहे आणि आपण कुठे जात आहोत हे देखील बऱ्याच अंशी माहीत आहे. जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो तेव्हा काय होते? दुसर्या देशात एक वर्ष घालवल्यानंतर, आपला स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल." अस या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीने म्हटलं आहे.
पुढं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, एक मोठे नुकसान किंवा मोठा बदल, आपल्याला असल्या जागी घेऊन जाऊ शकतो याची आपण कल्पनाही करु शकत नाही. मला आपल्या या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याची गरज आहे. काय बदल होतो हे पाहण्याची गरज आहे. बदलासह लढण्याशिवाय मी स्विकार करेन. असेही यात म्हटलं आहे.
शिल्पा शेट्टीच्या या पोस्टमुळे चाहते गोंधळले आहेत. चाहत्यांना कळत नाही की ही या पोस्टमधून शिल्पा शेट्टीचा इशारा पती राज कुंद्रावर आहे की दुसऱ्या कोणावर आहे. राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यापासून शिल्पाने त्याच्यासोबतचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. राज कुंद्रा तुरुंगात जाण्याअगोदर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह होता. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्व सोशल मीडिया अकाऊंट त्याने डिलीट केले आहेत. यामुळे आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रामध्ये सर्व काही ठीक आहे ना? अशी चर्चा सुरु आहे.