तूरडाळीच्या घाऊक किंमती घसरल्‍या! पहा ‘किती’ टक्क्यांनी झाली घट

Central government's decision to increase the purchase limit of pulses to curb inflation
Central government's decision to increase the purchase limit of pulses to curb inflation
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तूर डाळीच्या घाऊक किंमतीत २.८७ टक्क्यांची घट झाली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने दिली आहे. यंदा तूर डाळीची घाऊक किंमत ९२५५.८८ रूपये प्रति क्विंटल आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात तूर डाळीची घाऊक किंमत ९५२९.७९ प्रति क्विंटल होती. मे २०२१ मध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या किंमतीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि अत्यावश्यक वस्तू कायदा,१९५५ अंतर्गत गिरण्या, आयातदार आणि व्यापाऱ्यांकडे असलेल्या डाळींच्या साठ्याची माहिती सार्वजनिक करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

मूग वगळता सर्व डाळींवर साठा मर्यादा

केंद्राकडून २ जुलै २०२१ रोजी अधिसूचना काढली. यानूसार १९ जुलै ते ३१ नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी तूर,उडीद,मसूर,चणा या चार डाळींवर साठा मर्यादा लागू करून सुधारित आदेश जारी करण्यात आला होता.

डाळींची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि किंमती स्थिर करण्यासाठी, सुरळीत आणि विना अडथळा आयात सुनिश्चित करण्यासाठी सरकारने १५ मे ते ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत 'मुक्त श्रेणी' अंतर्गत तूर, उडीद आणि मूग आयातीला परवानगी दिली होती. तूर आणि उडदाच्या आयातीसंदर्भातील मुक्त व्यवस्था ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली. आयात धोरणामुळे तूर, उडीद आणि मूग यांच्या आयातीत गेल्या दोन वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

 हे ही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news