पैठण : शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यासाठी संप, तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प | पुढारी

पैठण : शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यासाठी संप, तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प

पैठण, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. तहसील कार्यालयाचे कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे कामकाज पूर्णतः बंद करण्यात आले असून पंचायत समितीचे कामकाज मात्र सुरळीत सुरू आहे.

आज (दि २३) व २४ फेब्रुवारी हे दोन दिवस राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरु केला आहे. या संपात पैठण तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, 5 अव्वल कारकून, 9 महसूल सहाय्यक, 10 मंडळ अधिकारी, 45 तलाठी , 4 शिपाई , 39 कोतवाल सहभागी झाले आहेत.

दरम्‍यान, नायब तहसीलदार व काही आधिका-यांच्या आधिपत्याखाली नेहमीप्रमाणे सर्व विभागाच्या कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यात आले आहे. या संपामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, पशुवैद्यकीय सेवा, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी विभाग, कृषी विभाग या विभागातील कर्मचारी हे या संपात सहभागी झाले नाहीत. तर त्‍यांनी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले.

तसेच, या संपामध्ये कर्मचारी सहभागी असले तरी ही पैठण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करून थकित महसूल वसुलीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी यांनी सहकार्य करावे यासाठी आज दुपारी तहसील कार्यालयात बैठक घेतली.

हे ही वाचा  

Back to top button