चांगला व्यायाम कोणता? चालणे की पायर्‍या चढणे? तज्ज्ञ काय सांगतात…

चांगला व्यायाम कोणता? चालणे की पायर्‍या चढणे? तज्ज्ञ काय सांगतात…
Published on
Updated on

नवी दिल्ली : सध्या बहुतांश लोक आपल्या आरोग्याबद्दल जागृत झालेले आहेत. अनेक लोक जीम, योगा यावर भर देतात. डॉक्टरही सांगतात बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे. बैठे काम वाढल्यामुळे दररोज किमान तासभर चालावे, असं डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ सांगतात. पण, काही तज्ज्ञ हे पायर्‍या चढण्याचाही सल्ला देतात. मग वजन कमी करण्यासाठी वॉकिंग की पायर्‍या चढणं, नेमका कुठला व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे, याबद्दल अनेक जण संभ—मात असतात. याबाबत तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती…

  • पायर्‍या चढताना कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
  • जास्त कॅलरीज बर्न होण्यासाठी या व्यायामांचा रोजच्या रुटिनमध्ये समावेश करणे गरजेचे.
  • एकाच वेळी दोन पायर्‍या चढल्यानेही फायदा होतो.
  • नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हा वजन कमी करण्याचा मार्ग आहे.

पायर्‍या चढण्यामुळे तुमच्या पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. त्याशिवाय ग्लुटस् आणि कोर स्नायू मजबूत होतात. स्नायू बळकट झाल्यामुळे बेसल चयापचय दर वाढण्यास फायदा मिळतो. साध्या शब्दात सांगायचं, तर तुम्ही विश्रांती करत असाल, तर त्यावेळीही तुमची कॅलरी बर्न होतात. वॉकिंगपेक्षा पायर्‍या चढताना तुमच्या लक्षात आलं असेल, यावेळी तुमचे हृदय गतीने वाढतं. अशात पायर्‍या चढताना कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.

पायर्‍यांमुळे व्यायामासह होते वेळेची बचत

एका अभ्यासानुसार एकाच वेळी पायर्‍या चढून तुम्ही चालण्यापेक्षा सुमारे 30 टक्के जास्त कॅलरीज बर्न करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी वेळात जास्त कॅलरीज बर्न होतात. वॉकिंग करून कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला एक तास चालवे लागते. तेच पायर्‍या चढून कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास पुरेसा आहे. शिवाय वॉकिंगसाठी तुम्ही आपल्या दररोजच्या वेळातून वेगळा वेळ काढवा लागतो. पण, ऑफिस किंवा बिल्डिंगमध्ये लिफ्टऐवजी पायर्‍यांचा वापर केल्यास तुमचा व्यायाम होतो. त्याचा अर्थ तुमच्या वेळेची बचत होते.

…अशा लोकांनी पायर्‍या चढण्याचा व्यायाम करू नये

पायर्‍या चढण्याचा फायदा तुम्हाला लक्षात आल्यानंतर याचा दुपटीने फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही वेगाने पायर्‍या चढू शकता. त्याशिवाय एकाच वेळी दोन पायर्‍या चढल्यानेही तुम्हाला फायदा होतो. तज्ज्ञ सांगतात की, पायर्‍या चढण्याचा व्यायाम हे प्रत्येकासाठी उपयुक्त नाही. ज्या लोकांना गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल त्यांनी पायर्‍या चढण्याचा व्यायाम करू नये. या लोकांनी चालण्याचा व्यायाम करावा. पायर्‍या चढणे आणि चालणे हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम मानला गेला आहे. तुमच्या प्रकृती आणि शारीरिक क्षमतेनुसार या दोन्ही व्यायामांचा तुमच्या रोजच्या रुटिनमध्ये त्याचा समावेश करावा. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार, हेच वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news