Walking benefits : जेष्‍ठांनी हृदयविकार टाळण्‍यासाठी दररोज किती पावले चालावी?, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती

walking exercise
walking exercise

पुढारी ऑनलाईन :  दररोज ६ हजार ते ९ हजार पावले चालणाऱ्या वृद्धांना हृदयविकाराचा धोका कमी असल्याचे नवीन संशोधनात  नमूद करण्‍यात आले आहे. तसेच चालणे हे  हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यांच्यातील दुवा असल्‍याचेही या  संशोधनात म्हटले आहे. अमेरिकन जर्नल सर्क्युलेशमध्ये म्‍हटले आहे की, "नियमित चालणे हे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. जे प्रौढ लोक दररोज ६ ते ९ हजार पावले म्हणजे सुमारे ६ किलोमीटर चालतात त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याची शक्यता ४० ते ५० टक्के कमी असते."

जर्नल सर्क्युलेशमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे की, ६० किंवा त्याहून अधिक वयाचे लोक जितके जास्त पावले चालतील तितका त्यांचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा (CVD) धोका कमी झाला. मात्र मध्यम वयातील व्यक्तींनी चाललेली पावले आणि हृदयविकार यामध्ये कोणताही संबंध आढळला नसल्याचे संशोधनात म्हटलं आहे.

संबंधित संशोधन आठ अभ्यासांमधील डेटाच्या आधारे मांडण्यात आले आहे.१८ वर्षांहून अधिक वयाच्या २० हजार १५२ लोकांचा समावेश करण्‍यात आला. या संशोधनामधील चालणे हे एका उपकरणाद्वारे मोजले गेले. व्यक्तींच्या प्रकृतीच्‍या सहा वर्षांहून अधिक काळ तपासणी करून, त्‍याच्‍या नोंदी ठेवण्यात आल्या आणि त्यांचा अभ्यास करण्यात आला.

पूर्वी हृदयरोग हा वृद्ध लोकांचा आजार मानला जातो असे; बदलेली जीवनशैली, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहा रुग्‍णांचे प्रमाण वाढल्‍याने हृदयविकाराचे प्रमाण वाढल्‍याचे दिसत आहे. यापूर्वी मार्च २०२२ मध्ये चालण्याचे आरोग्यावर होणारे फायदे यासंर्भातील अभ्यास लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. यामध्ये नियमित चालणे असणाऱ्या प्रौढ व्यक्तींमध्ये मृत्यूचा धोका कमी असल्याचे म्हटले होते. २०२० मध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशनने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्याने दररोज १० हजार पावले म्हणजेच ५ मैल चालण्याची शिफारस नागरिकांना केली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news