Heart attack : ‘या’ रक्तगटाच्या लोकांना हार्ट अ‍ॅटॅकचा धोका अधिक | पुढारी

Heart attack : ‘या’ रक्तगटाच्या लोकांना हार्ट अ‍ॅटॅकचा धोका अधिक

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हृदयविकारही (Heart attack ) जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. जर तुमचा रक्तगट ‘नॉन-ओ’ असेल तर तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एका अभ्यासानुसार ‘नॉन ओ’ म्हणजे ‘ओ’ रक्तगटाशिवाय अन्य रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.

रक्तगटामुळे हृदयविकाराचा धोका कसा वाढू शकतो हे संशोधकांनी शोधून काढले आहे. अभ्यासाचे निष्कर्ष आर्टिरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस, व्हॅस्क्युलर बायोलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) मध्ये प्रकाशित झाले आहेत. 4,00,000 हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की ‘ए’ किंवा ‘बी’ रक्तगट असलेल्या लोकांना ‘ओ’ रक्तगट  (Heart attack)  असलेल्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 8 टक्के जास्त असतो. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने 2017 मध्ये केलेल्या आणखी एका अभ्यासात 1.36 दशलक्षाहून अधिक लोकांचा समावेश होता.

‘ओ’ रक्तगट वगळता इतर सर्व रक्तगटांमध्ये कोरोनरी आणि हृदयाशी (Heart attack)  संबंधित समस्या होण्याचा धोका 9 टक्क्यांनी जास्त असल्याचेही या अभ्यासात आढळून आले आहे. संशोधकांनी रक्तगट ‘ए’ आणि ‘बी’ या दोन्हींची तुलना केली आणि त्यांना आढळून आले की ‘बी’ रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. अभ्यासानुसार, ‘बी’ रक्तगट असलेल्या लोकांना ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा मायोकार्डियल इन्फार्क्शनचा जास्त धोका असतो. रक्तगट ‘ए’ असलेल्या लोकांमध्ये ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा हार्ट फेल्युअरचा धोका 11 टक्के जास्त असतो.

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या मते, ‘ओ’ रक्तगट नसलेल्या रक्तगटांमध्ये हृदयविकाराचा (Heart attack)  झटका किंवा हार्ट फेल्युअरच्या धोक्यामागे अनेक कारणे असू शकतात. या रक्तगटाच्या लोकांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया जलद होते. 2017 च्या अभ्यासानुसार, ‘नॉन ओ’ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये ‘नॉन-विल्ब्रॅंड’ घटकांचे प्रमाण जास्त असते. हे थ्रोम्बोटिक समस्यांशी संबंधित रक्त गोठणारे प्रथिने आहे. ‘ए’ आणि ‘बी’ रक्तगट असलेल्या लोकांना रक्त गोठण्यामुळे थ्रोम्बोसिसचा धोका 44 टक्के जास्त असतो. हृदयकाराच्या झटक्यासाठी रक्ताच्या गुठळ्या जबाबदार असतात.

हेही वाचा : 

Back to top button