Virat Kohli reaction : ‘धुलाई’ उमेश यादवची चर्चा विराटच्‍या ‘रिॲक्‍शन’ची …

Virat Kohli reaction : ‘धुलाई’ उमेश यादवची चर्चा विराटच्‍या ‘रिॲक्‍शन’ची …
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्‍या तीन टी-20 सामन्यांची मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात मंगळवारी भारताचा ४ विकेटने पराभव झाला. ऑस्‍ट्रेलियाच्‍या कॅमेरुन ग्रीनच्‍या केवळ ३० चेंडूतील धमाकेदार ६१ धावांनी सर्वांनाच आवाक केले. त्‍याने ८ चौकार आणि चार षटकार फटकावत भारतीय गोलंदाजांना जेरीस आणले. भारताने प्रथम फलंदाजी करताना हार्दिकने ३० चेंडूत ७१ धावा केल्‍या होत्‍या. मात्र ग्रीनने भारतीय गोलंदाजांची अशी धुलाई केली की, हार्दिकची खेळी झाकोळली. ( Virat Kohli reaction )

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्‍या पहिल्‍या टी-२० सामन्‍यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अत्‍यंत सुमार राहिली. भुवनेश्‍वर कुमार अपयशी ठरला तर दुसरीकडे तीन वर्षांनंतर टी-२० फॉर्मेटमध्‍ये परतलेला उमेश यादवची कामगिरी खूपच खराब राहिली. उमेश यादवच्‍या पहिल्‍याच षटकामध्‍ये कॅमेरुन ग्रीनने आपल्‍या फलंदाजीचे आक्रमक रुप दाखवले.

Virat Kohli reaction : उमेशच्‍या पहिल्‍याच षटकात चौकारांची आतषबाजी

उमेश यादवच्‍या पहिल्‍या षटकात कॅमेरुन याने सलग चार चौकार लगावले. यावेळी कॅमेरुनच्‍या सलग चौकारावर विराट कोहलीची रिॲक्‍शन पाहण्‍यासारखीच ठरली. त्‍याने दिलेली रिॲक्‍शनचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे. विराट कोहलीच्‍या चेहर्‍यावरील हावभावामुळे त्‍याच्‍या चाहत्‍यांची मन दुखावले आहे. विराट ज्‍या पद्‍धतीन आवाक झाला याची चर्चा हा सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरला आहे. विराटचे हे हावभाव नवीन मीम्‍ससाठी उपयोगी पडतील, अशी खिल्‍लीही काही नेटकर्‍यांनी उडवली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news