International Day of Peace : संयुक्त राष्ट्रसंघ म्हणते; ‘वर्ण-वंशभेद संपवा. शांतता निर्माण करा’ | पुढारी

International Day of Peace : संयुक्त राष्ट्रसंघ म्हणते; 'वर्ण-वंशभेद संपवा. शांतता निर्माण करा'

पुढारी ऑनलाईन : दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस 24 तास अहिंसा आणि युद्धविराम पाळणे आणि शांततेच्या आदर्शांना बळकट करण्यासाठी समर्पित केलेला दिवस म्हणून घोषित केला आहे. आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची यावर्षीची थीम ही End racism. Build peace. (वर्ण-वंशभेद संपवा. शांतता निर्माण करा) अशी आहे. खरी शांती मिळवण्यासाठी शस्त्रे ठेवण्यापेक्षा बरेच काही आवश्यक आहे, असे मतही संयुक्त राष्ट्रसंघाने (International Day of Peace) व्यक्त केले आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासदांना जशा हव्या तशा वसाहती उभा करून, त्यामध्ये लोकांना त्यांच्या वंशाची पर्वा न करता समान वागणूक दिली जावी, असे मत यावर्षीच्या थीमबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने स्पष्ट केलेआहे. (https://www.un.org/en/observances/international-day-peace)

यावर्षीच्या थीमवर बोलताना, सध्या जगभरात कोविड-१९ च्या हल्ल्यानंतरही अनेक देशामध्ये सत्तासंघर्ष होत आहे. वर्णद्वेष पसरवणाऱ्या संरचना नष्ट करण्यासाठी आपण काम करू शकतो. आम्ही सर्वत्र समानता आणि मानवी हक्कांच्या चळवळींना पाठिंबा देऊ शकतो. आम्ही द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध ऑफलाइन आणि ऑनलाइन बोलू शकतो. आम्ही शिक्षण आणि पुनरुत्पादक न्यायाद्वारे वर्णद्वेषविरोधी प्रचार करू शकतो, वर्णभेदाचा सामना करण्यासाठी आणि जगभर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत संयुक्त राष्ट्राने (International Day of Peace)  व्यक्त केले आहे. तसेच जगभरातील देशादेशातील वाढती स्पर्धा, द्वेष आणि भेदभाव नष्ट करून संयुक्त राष्ट्रांच्या पाठीशी उभे राहा. असेही आवाहन या दिनी संयुक्त राष्ट्राने केले आहे.

जगभर विविध कारणांनी लोक संघर्ष करत आहेत. त्यामध्ये जगभरात सीमेवरून अनेक देशात भेदभाव निर्माण केला जात आहे. आज जगभरात विविध देशांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे अशांतता आणि युद्धाचे वातावरण आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील दीर्घकाळ चाललेले युद्ध अद्याप संपलेले नाही. तर दुसरीकडे चीन, पाकिस्तान हे भारतविरुद्ध सतत कुरापती करत आहेत. पण असं वातावरण नाहीसं होऊन, परस्पर बंधुता आणि सौहार्द वाढवण्याच्या उद्देशाने हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आज जगभर साजरा केला जातो.

International Day of Peace : काय आहे इतिहास?

आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाची स्थापना 1981 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने केली. दोन दशकांनंतर म्हणजे 2001 मध्ये, महासभेने एकमताने हा दिवस अहिंसा आणि युद्धविरामाचा कालावधी म्हणून सुरू करण्यासाठी अनेक देशांचे मतदान घेतले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा 1982 पासून ‘Right to peace of people’ या थीमसह सुरू करण्यात आला. 1982 ते 2001 पर्यंत, सप्टेंबरचा तिसरा मंगळवार हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जात होता. परंतु, 2002 पासून, 21 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिन साजरा केला जातो. जगभरात शांततेचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने कला, साहित्य, संगीत, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना शांतता दूत म्हणून नियुक्त केले आहे.

Back to top button