पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सर्वांचा आवडता खेळाडू आहे. इंस्टाग्रामवर त्याची लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू सतत वाढत आहे. यावर्षी तो इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. एका रिपोर्टनुसार, कोहलीने २०२३ मध्ये इंस्टाग्रामवर प्रमोशनल पोस्टसाठी १४ कोटी रुपये चार्ज केले होते. या यादीत फुटबॉल दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. (Virat Kohli)
रोनाल्डोचा इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी ३.२३ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे २६.७५ कोटी रुपये आकारतो. त्याच्यासोबत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी इंस्टाग्रामवरील प्रत्येक पोस्टसाठी २.५६ दशलक्ष म्हणजेच २१.४९ कोटी रूपये आकारतो. (Virat Kohli)
या यादीत टॉप २० मध्ये स्थान मिळवणारा विराट कोहली एकमेव भारतीय आहे. अहवालानुसार, तो इंस्टाग्रामवर प्रति पोस्ट १.३८ दशलक्ष डॉलर चार्ज करतो. एका पोस्टमधून त्यांची कमाई सुमारे ११.४५ कोटी रुपये इतकी आहे. त्याचे सध्या इंस्टाग्रामवर २५६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
हॉपर एचक्यू आणि त्याचे सह-संस्थापक, माईक बँडर यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे, गेल्या काही वर्षांत Instagram वरील मोठ्या खेळाडूंची कमाई कशी वाढली आहे हे पाहून आश्चर्यचकित झाले. स्पोर्ट्स सुपरस्टार्सचा प्रभाव मैदानावरही कसा पसरतो यावर त्यांनी प्रकाश टाकला.
बंडर म्हणाले, सेलिब्रिटींची चमक आणि ग्लॅमर अजूनही कायम आहे. रोनाल्डो आणि मेस्सी केवळ मैदानासोबतच डिजिटल क्षेत्रातही वर्चस्व गाजवत आहे. या यादीत भारतीयांमध्ये बॉलीवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा २९ व्या स्थानावर आहे. अहवालानुसार ती एका पोस्टसाठी ४.४० कोटी रूपये आकारते.
हेही वाचा;