

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठा महासंघप्रणीत शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने रविवारी (दि. 6) यंदा दै. 'पुढारी'चे पत्रकार प्रसाद जगताप यांना 'समाजऋण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शिवदर्शन येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या सभागृहात पार पडला.
या वेळी कार्यक्रमाला लिज्जत पापडचे सुरेश कोते, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गुलाब गायकवाड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त अक्षय गोडसे, योगगुरू दीपक शिळीमकर, ज्योतिषाचार्य देशमुख गुरुजी, माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, आम आदमी पार्टीचे पुणे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे संस्थापक आबा बाबर आणि संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा 12 वे वर्ष होते. प्रास्ताविक अशोक साळेकर यांनी केले. सूत्रसंचालन किरण कद्रे यांनी केले.
या वेळी 97 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थिनीला संगणक देण्यात आला तसेच द्वितीय क्रमांक असलेल्या दोघांना स्मार्ट वॉच देण्यात आले. तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थिनीसह अन्य 40 विद्यार्थ्यांना एक हजार रुपये शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच, या वेळी 50 रिक्षाचालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
हेही वाचा