parrot Viral video: मालकाची जादू आणि पोपटाच्‍या चक्‍कीत जाळ! व्‍हिडीओ पाहाल तर नॉनस्‍टॉप हसाल

parrot Viral video: मालकाची जादू आणि पोपटाच्‍या चक्‍कीत जाळ! व्‍हिडीओ पाहाल तर नॉनस्‍टॉप हसाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सध्‍या सोशल मीडियावर एका पाळीव पोपटाचा व्‍हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे. ( parrot Viral video ) पोपट हा एक सर्वात शहाणा पक्षांपैकी एक मानला जातो. त्‍याला प्रशिक्षण दिलं तर तो लवकर शिकतो. त्‍याची ग्रहणक्षमता ही चांगली असते. इंटरनेटच्‍या जगामध्‍ये पाळीव प्राण्‍याचे खूप मजेशीर आणि रंजक व्‍हिडीओ शेअर केले जातात. त्‍याला पसंतीही मोठ्या प्रमाणावर मिळते. नुकताच असाच एक व्‍हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे. यामध्‍ये मालकाने केलेली जादू पाहून पोपट आवाक होतोच त्‍याचबरोबर प्रचंड घाबरल्‍याचे पाहायला मिळते.

parrot Viral video : नेमकं काय घडलं ?

पाळीव प्राण्‍यांबरोबर पुरसतीचा वेळ घालवण्‍यास सर्वांनाच आवडतं. त्‍यांच्‍याबरोबर केलेली मस्‍तीचे व्‍हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होतात. असाच एक व्‍हिडीओ सध्‍या व्‍हायरल होत आहे. यामध्‍ये पाळीव पोपटाला त्‍याचा मालक हा जादू दाखवतोय. ती पाहातच काही क्षण पोपटाच्‍या पायाखालीची जमीनच सरकते.

या व्‍हिडीओमध्‍ये मालक हा आपल्‍या पाळीव पोपटासमोर एक जादू करताना त्‍याच्‍यासमोर चादर पसरतो. दोन ते तीनवेळा तो चादर वरखाली करतो. यानंतर अचानक चादर खाली पडते आणि मालक गायब होतो. हा जादूमुळे पोपट काही क्षण आवाक होतो. तो जोरजोरात ओरडू लागतो. मालकाने केलेली जादू पाहून पोपटाची उडालेली भंबेरी तुम्‍हाला मनमुदार हसवून जाते.

हा व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत आहे. याला लाखो व्‍हूज मिळघले आहेत. तब्‍बल ४४ हजार जणांना त्‍याला लाईक केले आहे. तसेच हजारो यूजर्संनी यावर दिलखुलासपणे आपली प्रतिक्रियाही नोंदवली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news